Suresh Dhas : ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे.  त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते. 


सुरेश धस म्हणाले की, जगात जर्मनी अन् देशात परभणी असे देशात नाव आहे. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. परभणी किती रगेल आहे हे मला माहितीय. या परभणीत सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलीचे शिक्षण घेणारा मुलगा. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय आंदोलन करताहेत, तेही आपलेच लोक आहेत. कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आणि वाकोडे साहेबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमनाथ सूर्यवंशी  कुटुंबीय, वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


त्या लेकराने काय बिघडवले होते?


ते पुढे म्हणाले की, बीड वाल्याबद्दल काय काय सांगावे? आका, आकाचे आका... माझ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. न्यायालयीन चोकशी झाली पाहिजे, यांना मोक्का लागला पाहिजे. हा जो आका आहे ना. तो आता गेलाच पाहिजे. जर आकाच्या आकाने काही केले तर तोही गेलाच समजा.  ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे.  त्या लेकराने काय बिघडवले होते? फक्त एका दलित मुलाला वाचवायला गेला म्हणून असे करता?  आकाच्या आकांनाही जर ते व्हिडिओ दाखवले असतील तर बघा तुमची पण वेळ येणार आहे. 



अजित दादा क्या हुआ तेरा वादा


आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असे सुद्धा तुम्हाला करावे लागेल, सो चूहे खाके बिल्ली हज को चली, असे म्हणतात तसाच काहीसा प्रकार काल-परवा झाला. ते म्हणाले की, जो जो दोषी असेल, त्यांना फाशी द्या. आधी त्यांनी आधी नीट वागायला सांगायचे ना. अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने जैसा नही है! असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. संदीप दिघोळेपासून तर संतोष देशमुख यांच्यापर्यंतच्या हत्येचा अजितदादा हिशोब करा. या हत्या कोणी घडवून आणल्या? त्याचा मास्टरमाइंड कोण? हे उद्योग कोणी केले हे जर तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा. बारामतीचे माणसं पाठवा, असेही त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


22-23 दिवस दोघांनी गुंगारा देत फिरले; घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; अंबादास दानवेंचं ट्विटची चर्चा