Girish Mahajan, in Solapur : "उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तर गंमतच केलीये. नितीन गडकरींना मंत्री करायला निघालेत. दोन खासदार निवडून येण्याची तयारी आहे का? नितीन गडकरींना म्हणतात मंत्री करतो. म्हणजे हे पंतप्रधान होणार आहेत. त्यांना मंत्री करणार आहेत अशा अविर्भावात ते आहेत. ते बिन बुडाचे बोलतच राहणार आहेत", अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. सोलापूर येथे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.


राहुल गांधींपेक्षा नगरसेवकांची सभा चांगली होते


गिरीश महाजन म्हणाले, राहुल गांधी यांच्यापेक्षा आमदार, नगरसेवकांची सभा चांगली होते. अनेक खुर्च्या खाली होत्या. राहुल गांधी कुठून आले आणि कुठून गेले हे चित्र मला कुठे दिसले नाही. इंडिया आघाडी स्थापन केली आणि त्यात ते गेलेच नाहीत. इंडिया आघाडीत कोण राहिले आहे? आपल्या पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले? कोरोना काळात लॅपटॉपवर बसायचे, असे म्हणत महाजन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. 


सोलापुरात कोणाला उमेदवारी? 


एक-दोन दिवसात उमेदवारांची यादी येईल त्यावेळेस सोलापूरचा उमेदवार कोण सांगता येईल. जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट मिळेल. पार्लमेंटरी बोर्डाकडून उमेदवार जाहीर केला जाईल. 2019 साली  जय सिद्धेश्वर यांनी फॉर्म भरला होता त्यावेळेस आम्हालाही वाटले नव्हते. त्यामुळे जाती दाखल्याबाबत पक्षाला दोष देता येणार नाही हा निर्णय न्यायप्रविष्ठ आहे. उद्या परवामध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषणा होतील, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. 


 शरद पवारांवर प्रेम आहे ते हळूहळू कमी होत जाईल


पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजित पवार गटात गेलेल्या काही आमदारांचे शरद पवारांवर प्रेम आहे . त्यामुळे त्यांनी स्वागताचे बॅनर लावले. शरद पवारांवर प्रेम आहे ते हळूहळू कमी होत जाईल. मात्र त्या बॅनर वरच्या फोटोवरुनच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अपेक्षा घेतला. अजित पवार यांनी त्यांना सूचना दिल्या आहेत. माढा लोकसभेत निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर दोन-चार दिवस नाराजगी चालणारच आहे. उमेदवारी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली की, सर्वांची नाराजी दूर केली जाईल. मोहिते पाटील यांच्या संपर्कात मी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आहोत. राज्यात प्रत्येक ठिकाणी नाराजगी असते. त्या ठिकाणी जाऊन  समजावले जाईल, असेही महाजन यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या