Chhagan Bhujbal : नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) उमेदवारीची घोषणा केली. यामुळे महायुतीत (Mahayuti) मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. कालच श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला भाजपकडून विरोध करण्यात आला. श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तातडीने नाशिक गाठले होते. 


आता भाजप (BJP) पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला विरोध करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलेच कसे? असा सवाल श्रीकांत शिंदेंना विचारला आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत आणखी एक मिठाचा खडा पडल्याचे दिसून येते. 


भाजपकडून हेमंत गोडसेंना विरोध होणे स्वाभाविक


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, भाजपकडून हेमंत गोडसेंना विरोध होणे स्वाभाविक आहे.  श्रीकांत शिंदेना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नसून युतीत सगळ्यांनी थोडीशी शिस्त पाळली पाहिजे. उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलेच कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


जागावाटपाबाबत काय म्हणाले भुजबळ? 


महायुतीच्या जागावाटपाबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, मला त्याबाबत माहिती नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल याबाबत सांगतील. आचारसंहिता लागल्यानंतर अडचण होणार आहे.   बैठक घेता येतात पण उमेदवाराला पैसे लावावे लागतात.  महायुतीत मनसेला जागा देणार का? याबाबत भुजबळ म्हणाले की, त्याबाबत मी काही अभ्यास केला नाही, मी एवढा ज्ञानी नाही, असे त्यांनी सांगितले. 


भुजबळ सॉफ्ट टार्गेट


सुप्रीम कोर्टात पवारांचे वकील संघवी यांनी निवेदन केले की, शरद पवारांचे फोटो दाखवून मत घ्या असे भुजबळ म्हणाले होते. पण मी असे कधीच बोललेलो नाही.अजित पवार गट झाल्यापासून एकही निवडणूक झाली नाही. मी अजून कुठलाही प्रचार करताना शरद पवारांचा फोटो ग्रामीण भागात दाखवला नाही. हे एकदम चुकीचे फिडिंग सिंघवी यांनी शरद पवार गटाकडून केले आहे. भुजबळ सॉफ्ट टार्गेट आहे. कोर्टाची दिशाभूल केली जात आहे. छगन भुजबळांचे नाव आज सर्व वर्तमानपत्रात झळकले. पण मी शरद पवार यांचा फोटो दाखवा आणि मत द्या असे कुठेही बोललेलो नाही. निवडणूक चिन्ह दाखवायची अजून वेळच आलेली नाही, निवडणूकच झालेली नाही, असे ते म्हणाले. 


आणखी वाचा 


Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वेळ ठरली