Ghansawangi Vidhansabha: विधानसभेच्या निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच घनसावंगी विधानसभा मतदासंघात (Ghansawangi assembly constituencies) महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंचा (Rajesh Tope) बालेकिल्ला असलेल्या घनसावंगी मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं (Shivsena) दावा केलाय. त्यामुळं राजेश टोपे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केला दावा
जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या जागेवर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदासंघावर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी दावेदारी जाहीर केली आहे. घनसावंगी येथे आज शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात एकमताने निर्धार करत घनसावंगीची जागा ऊबाठा ला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले, जागांचा वाद कायम
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आला असलं, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही खल सुरूच आहे. दोन्हीकडेही सर्वच पक्षांनी जागांवर दावा केल्याने तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे अजूनही दोन-तीन दिवस महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जातील असं बोललं जात आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीकडून जवळपास 240 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आघाडीकडून 220 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. महायुतीकडे अजूनही 48 जागांवरती खल सुरूच आहे, तर महाविकास आघाडीकडून अजूनही 68 जागांवर पेच कायम आहे. त्यामुळे 20 तारखेपर्यंत या जागा निश्चित करून जागावाटप जाहीर केलं जाईल, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे जागावाटप पुढील तीन ते चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: