Ghansawangi Vidhan Sabha constituency Election Result : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) मराठवाडा हा भाग केंद्रस्थानी आला आहे. ओबीसी आरक्षण, आरक्षणाचा मुद्दा याच मराठवाड्यात पेटल्यामुळे या भागातील मतदार नेमकं कोणाच्या पाठीशी राहणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठवाड्यातही घनसावंगी हा मतदार चर्चेचा विषय ठरतो आहे. कारण येथे चक्क चौरंगी लढत होत आहे. 


घनसावंगीमध्ये होतेय चौरंगी  लढत  


घनसावंगी मतदारसंघात चांगलीच अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. कारण या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी ताकदीचे उमेदवार दिले आहेत. येथे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेश टोपे तर महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिकमत उढाण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. विशेष म्हणजे भाजपचे नेते सतीश घाडगे यांनी यावेळी बंडखोरी केली असून ते या जागेसाठी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हेदेखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे घनसावंगी येथे थेट चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बंडखोरीमुळे येथे मतफुटीही होऊ शकते. त्यामुळे येथे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


2019 सालच्या निवडणुकीत काय घडले होते? 


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (अविभाजित) राजेश टोपे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 107849 मतं मिळाली होती. या मतांचे प्रमाण हे एकूण मतांच्या 47.1 टक्के होते. दुसरीकडे शिवसेनेचे (अविभाजित) हिकमत उढाण यांनीही तब्बल 104440 मते मिळवली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 45.6 टक्के होते. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू शेळके होते. त्यांना 9293 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच टोपे 2019 साली येथे टोपे यांचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे यावेळी या जागेवरची लढत ही अटीतटीची ठरणार आहे. 


टोपे यांनी जिंकल्या सलग तीन निवडणुका


2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही राजेश टोपे यांनीच बाजी मारली होती. त्यांना एकूण 98030 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण हे 45.89 टक्के होते. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीतही राजेश टोपे यांनीच बाजी मारली होती. त्यांना एकूण 104206 मतं मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या मतांचे प्रमाण 54.22 टक्के होते.  


हेही वाचा :


Jalna Vdhan Sabha Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?


Jalna Candidate List : जालन्यातील बदनापूरमध्ये कोण मारणार बाजी? महायुती ठरणार सरस की मविआ जिंकणार?