Gautam Gambhir on Lok Sabha Election 2024 : माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) राजकारणातून संन्यास घेण्याची मोठी घोषणा केली आहे. गौतम गंभीरने आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. गौतम गंभीरने ट्वीट करत जे. पी. नड्डा यांच्याकडे ही मागणी केली आहे. राजकीय कर्तव्यातून मुक्त केल्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रीय करेन, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 


लोकसभा निवडणूकीपूर्वी गौतम गंभीर यांचा राजकारणातून संन्यास


भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरने राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्धार केला आहे. गौतम गंभीरला त्यांच्या राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे. गंभीरने एक्स मीडिया म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एक्स मीडियावरील पोस्टमध्ये गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा केली. क्रिकेटमुळे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं गंभीरने सांगितलं आहे.


ट्वीट करत दिली माहिती


गौतम गंभीर हा सध्याचा पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून त्याने आता 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर गंभीरने दमदार विजय मिळाला होता. 


गौतम गंभीर यांचं ट्वीट






गौतम गंभीरची क्रिकेटमधील कारकिर्द


गौतम गंभीरने भारतासाठी 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गौतम गंभीर 2011 च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. याशिवाय तो 2007 च्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीमचाही एक भाग होता. गौतम गंभीर गेल्या वर्षी आयपीएममुळेही चांगलाच चर्चेत आला होता.


पाहा व्हिडीओ : आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची गौतम गंभीर यांची घोषणा!