Ganpat Gaikwad, Kalyan east : भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभेत भाजपाकडून उमेदवारी जाहीर केलीये. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला,फटाके फोडत घोषणाबाजी देत जल्लोष साजरा केला. विद्यमान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेला जवळपास आठ महिने उलटून गेले आहेत. गणपत गायकवाड या गुन्ह्यामध्ये तळोजा जेलमध्ये आहेत.  पक्षाकडून गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे शिंदे गटांमध्ये नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून बंड पुकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.


भाजपची मुंबईतील 14 उमेदवारांची नावं


1) मुलुंड - मिहिर कोटेचा 
2) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर 
3) चारकोप - योगेश सागर 
4) मालाड पश्चिम - विनोद शेलार 
5) गोरेगाव - विद्या ठाकूर 
6) अंधेरी पश्चिम - अमित साटम 
7) विलेपार्ले - पराग अळवणी 
8) घाटकोपर पश्चिम - राम कदम 
9) वांद्रे पश्चिम- आशिष शेलार 
10 सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन 
11)वडाळा - कालिदास कोळंबकर 
12)मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
13)कुलाबा- राहुल नार्वेकर3
14)दहिसर - मनिषा चौधरी


मुंबईतील काही जागांची घोषणा भाजपकडून अद्यापही नाही 


भाजपकडून नव्या उमेदवारांना संधी 


प्रतिभा पाचपुते - श्रीगोंदा 


विनोद शेलार - मालाड पश्चिम 


राजेश बकाने - देवळी (गेल्यावेळी अपक्ष) 


श्रीजया चव्हाण - भोकर 


शंकर जगताप - चिंचवड 


विनोद अग्रवाल ( गेल्यावेळी अपक्ष) - गोंदिया 


अनुराधा चव्हाण - फुलंबरी


सुलभा गायकवाड ( आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) - कल्याण पूर्व 


राहुल आवाडे - इचलकरंजी 


अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर


भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये 


- जिथे उमेदवार बदल नाही अशी नाव जाहीर 
- वादाच्या जागा पाहिल्या यादीत टाळल्या आहेत 
- उमेदवार बदलले जातील अशा जागा दुसऱ्या यादीत असतील 
- विदर्भात कुणबी उणेदवार अधिक 
- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सीटिंग गेटिंग
- मराठवाड्यात मराठा उमेदवार जास्त


मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाल्याने चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डोंबिवलीतील ग्रामदैवत गणेश मंदिर येथे जाऊन गणेशाचे दर्शन घेतले तसेच उद्या कोकणातील भराडी देवीच्या दर्शनासाठी मंत्री चव्हाण जाणार आहेत. 22ऑक्टोबरपर्यंत महायुतीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर जोरदार प्रचार करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. 


साड्या देऊन आमची मतं विकत घेता का? दत्तात्रय भरणेंविरोधात महिलांचा आक्रोश, साड्या रस्त्यावर फेकल्या