Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024 : सध्याघडीला राज्यासह देशात भाजप विरोधी वातावरण आहे. तरी सुद्धा अलिकडे विविध माध्यमांकडून आलेले एक्झिट पोलचे (Exit Poll Result 2024) आकडे म्हणजे दाल मे कूच काला है, असेच काहीसे आहे. मात्र, गडचिरोलीची (Gadchiroli Chimur Lok Sabha) जागा आम्ही एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू, किंबहुना ही जागा आम्ही हरल्यास येणाऱ्या निवडणुका न लढण्यासाठी विचार आम्ही केला असून मी राजकीय संन्यासच घेणार, अशी जाहीर भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी घेतली आहे. महाविकास आघाडी विदर्भातील दहा पैकी 10 जागा जिंकेल. तर राज्यात कमीत कमी 35 जागा आम्ही जिंकू असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
राज्यात आमच्या सभांमध्ये लोकांचा प्रचंड सहभाग आणि जल्लोष होता. मात्र केवळ सत्ताधाऱ्याना खुश करण्यासाठी हे एक्झिट पोलचे आकडे भाजपच्या फेवरमध्ये दिले आहेत. दुसरीकडे उद्या मतमोजणीला उशीर झाला तरी चालेल. पण सी-17 फार्म आणि मशीन बरोबर लावून येणारा सी-17 फार्मची आकडेवारी जुळल्याशिवाय मशीन उघडली जावू नये, अन्यथा ती मशीन बाजूला ठेवावी. अशा सूचनाही आम्ही केल्या असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
तर पुढची निवडणूक न लढवता राजकीय संन्यास घेणार
गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मी फिरलो आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असून सरकार प्रति जनमानसात प्रचंड संताप आहे. आजवर जिथे जिथे मी गेलो तिथे लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद होता. मात्र असं असताना देखील अलीकडे आलेले एक्झिट पोलची आकडेवारी बघितल्यास आणि त्यातल्या त्यात गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची जागा जर का पिछाडीवर दाखवत असेल, तर नक्कीच दाल में कुछ काला हैं, असेच म्हणावे लागेल.
लोकांनी सत्ताधाराविरुद्ध संताप, राग मतदानातून व्यक्त केला आहे. असे असतानाही 300 ते 400 जागा जर हे एक्झिट पोल भजपच्या बाजूने दाखवत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड असायला वाव आहे. जर का गडचिरोली मतदारसंघातील जागा ही पिछाडीवर दाखवत असेल, तर पुढे आम्ही ठरवले आहे की, आम्हाला इथे पराजय मिळत असेल तर पुढची निवडणूक न लढवता राजकीय संन्यास घ्यावा, अशी आमची भूमिका असल्याची जाहीर भूमिका विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या