नांदेड: राजकीय पूर्व वैमनस्यातून हिमायतनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर रात्री चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या जिवघेण्या हल्ल्यात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गंभीर जखमी झाले. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला आहे.


राठोड आणि सूर्यवंशी यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वाद सुरू होता. रात्री भाजपचे राम सूर्यवंशी आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात पुन्हा वाद झाला आणि या वादातून राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोडवर चाकूने हल्ला केला. राठोड या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. राठोड यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.


नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव


अशोक चव्हांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला. 


संबंधित बातमी:


Vidhansabha Election : लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील विधानसभेचं चित्र कसं असेल? आज निवडणूक झाली तर राज्यात कुणाची सत्ता?