एक्स्प्लोर

Bihar Politics: 24 ऑगस्टला होणार फ्लोर टेस्ट, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा निर्णय

Bihar New Government Formation: बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाली आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली.

Bihar New Government Formation: बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाली आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून 24 ऑगस्टला नितीश आणि तेजस्वी यांच्या सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे.

बिहारमधील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आता बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यात आरजेडी, जेडीयू, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत.

याआधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच मोठी घोषणा केली आहे. येत्या एक महिन्यात राज्यातील गरीब आणि तरुणांना बंपर रोजगार दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले. तेजस्वी यादव म्हणाले की, हा रोजगार मेळावा इतका भव्य असेल, जो आतापर्यंत इतर कोणत्याही राज्यात झाला नाही. तत्पूर्वी, तेजस्वी म्हणाले की, बिहारने देशाला जे हवे होते ते केले आहे. आम्ही त्यांना मार्ग दाखवला आहे. आमचा लढा बेरोजगारीविरोधात आहे, असं ते म्हणाले. 

बिहारमधील राजकीय परिस्थितीवर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन (लालन) सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांना 2020 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. परंतु तुम्ही (भाजप) त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री बनवले. आरसीपी सिंह हे भाजपचे एजंट म्हणून जेडीयूमध्ये आले. तुम्ही (भाजप) युती धर्म पाळला नाही, आम्ही आयकर, सीबीआय आणि ईडीला घाबरत नाही.

दरम्यान, नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस (Congress)  आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

PM Modi : शेतातील पाचटापासून होणार बायो फ्युअल इथेनॉलची निर्मिती, पंतप्रधान मोदींकडून 900 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घघाटन
Justice Uday Lalit : न्या. उदय लळीत यांची 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती, कायदा मंत्रालयाकडून परिपत्रक जारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget