(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाग सोमय्या भाग, हा नवीन चित्रपट काढा; संजय राऊतांचा सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा
Sanjay Raut and Kirit Somaiya: विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sanjay Raut and Kirit Somaiya: विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. तर सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. यावरूनच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या याना लक्ष केलं आहे. राऊत म्हणाले आहेत की, बाप बेटे जेल जायेंगे. ते ट्वीट करत असं म्हणाले आहेत. संजय राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''पिता-पुत्र तरुंगात जाणार. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या शेजारच्या कोठडीत राहणार.'' हे ट्वीट करत राऊत यांनी एक शायरी देखील शेअर केली आहे.
बाप बेटे जेल जायेंगे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे.. pic.twitter.com/CVgMAlLmOT
तुम्ही इतरांना कायद्यांसोमर जा म्हणता, मग तुम्ही का पळता
आपल्या ट्वीटनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ''आता भाग सोमय्या भाग, हा नवीन चित्रपट काढायला हवा. जर तुम्ही गुन्हा केला नाही, आम्ही घाबरत नाही म्हणता. तुम्ही इतरांना त्यांच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारता. कोर्टाला आणि कायद्याला सामोरे जा म्हणता, मग तुम्हीच का पळता.'' ते म्हणाले की, आयएनएस विक्रांत संदर्भात जो घोटाळा झालेला आहे, असा प्रकार देशात कधी झाला नव्हता. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळला आहात.'' तसेच ज्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या मदतीने आपण पाकिस्तानला हरू शकलो. अशा युद्धनौकेचे जतन करावी. ती पुढच्या पिढीला पाहता यावी यासाठी त्याच म्युझियम करावं, अशी सर्वांची भावना होती. त्यात आम्ही ही होतो, असं राऊत म्हणाले आहेत.
सोमय्यांनी गोळा केलेले 711 डबे गेले कुठे?
राऊत म्हणाले की, ''विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी आम्ही त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चौव्हाण यांना विनंती केली होती. आपल्या देशासाठी शे-दोनशे कोटी जास्त नाही. मात्र दुर्देवाने ते होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमय्या यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी मी 140 कोटी जमा करणार असं ट्वीट केलं होत. त्यांनी त्यावेळी ठिकठिकाणी 711 डब्बे जमा केले. याशिवाय त्यांनी सेव विक्रांतच्या नावाखाली अनेकांकडून पैसे घेतले.'' राऊत म्हणाले, हे पैसे तेव्हा त्यांनी राजभवनात जमा करू, असं सांगितलं. मात्र राजभवनाचे अकाउंट नाही आहे. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री निधीत किंवा केंद्रात द्यायचे होते हे पैसे. आता मी असं ऐकलं की त्यांनी हे पैसे पक्षाकडे जमा केले. त्यांनी हे पैसे निवडणुकीत वापरले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच हे सोमय्यांनी गोळा केलेले 711 डबे गेले कुठे, असा प्रश्न ही केला आहे.