Farooq Abdullah speech Shivaji Park Mumbai : मणिपूर येथून निघालेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) समारोप होत आहे. या निमित्त देशातील इंडिया आघाडीचे अनेक बडे नेते जाहीर सभेसाठी उपस्थित आहेत. या सभेत संबोधित करताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांनी (Farooq Abdullah) मोठी घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून (India Alliance) पहिलीच सभा मुंबईत पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीकडून शिवाजी पार्कमधून फुंकण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एम. के. स्टालिन आणि फारुख अब्दुला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात करण्यात आली.
फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा
यावेळी फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शिख असेल देशातील सर्वजण भारतीय आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद होईल. त्याशिवाय निवडणूक आयोग पूर्णपणे मुक्त होईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. आपल्यापुढे खूप सारी आव्हानं आहेत, त्याचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सर्वजण येथे आज जमले आहेत. गॅस, पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण निवडणुका आल्यामुळे आता किंमत कमी करण्यात आली आहे. मात्र महागाई प्रचंड वाढली आहे. गरिबी वाचवण्याबद्दल बोलत होते, पण खरेच गरीबी संपली का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी पुढे म्हणाले की, चार हजार किमीची यात्रा मला करायची याबाबत मी 2014 मध्ये विचार केला असता तर ते शक्य झाले नसते. मात्र मला यात्रा का करावी लागली? फक्त राहूल गांधी चालले नाही तर सर्व विरोधी पक्षाचे लोक चाललेत. सोशल मिडिया संदर्भात अमेरिकेच्या कंपनीवर दबाव आहे. आम्ही नाही भाजपच्या विरोधात लढत आहोत. ना एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी आणि सीबीआयमध्ये आहे, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केली.
इतर महत्वाच्या बातम्या
शिवतीर्थावर पोहोचताच राहुल गांधींकडून छत्रपती शिवराय, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन