Arunachal Pradesh And Sikkim Elections : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि सिक्किम (Sikkim) मतमोजणीची तारीख (Lok Sabha Election Counting ) बदलली आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम लोकसभा आणि विधानसभा मतमोजणी आता 2 जूनला (Lok Sabha Election Result Date) होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम लोकसभा आणि विधानसभेचा निकाल आधी 4 जूनला लागणार होता. मात्र, आता ही तारीख बदलून 2 जून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या दोन राज्यांच्या निकालाची तारीख बदलली असून त्याचं कारणही सांगितलं आहे.


अरुणाचल, सिक्किम मतमोजणीची तारीख बदलली


अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 जून 2024 रोजी लागणार आहे. अरुणाचल प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होईल, त्यानंतर उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर 28 मार्चला उमेदवारी अर्ज पडताळणी होईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे.


निकालाची तारीख बदलण्याचं कारण काय?


अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जूनला संपणार आहे. यामुळे मतमोजणी 2 जून पर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे. या कारणामुळे निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालाच्या तारखा बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता या दोन राज्यांची मतमोजणी 4 जूनला नाही तर 2 जूनला होईल. यामुळे 2 जूनला या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.


अरुणाचल, सिक्कीममध्ये किती जागा आहेत?


अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 60 आहे. 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 41 जागांवर विजय मिळाला होता. विरोधी पक्षांना फार कमी जागा मिळवता आल्या. त्याचप्रमाणे सिक्कीम विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 32 आहे. येथील बहुमताचा आकडा 17 जागांचा आहे. गेल्या निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला 17 तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला 15 जागा मिळाल्या होत्या. सिक्कीम लोकसभेची जागाही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने जिंकली. अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एनडीएने एक जागा जिंकली होती आणि यूपीएने एक जागा जिंकली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha Election 2024 Date : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक, तुमच्या भागात मतदान कधी होणार? जाणून घ्या सोप्या भाषेत