Rahul Gandhi Live Updates : ईव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत; राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पोहोचले आहेत. या सभेसाठी उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे दिग्गज नेते शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Mar 2024 09:05 PM
Rahul Gandhi Live Updates : देशातील 90 अधिकारी देश चालवतात, राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi Live Updates : राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, 'देशातील 90 अधिकारी देश चालवत आहे, मी या सिस्टमला समजू शकतो, मी ते आतमधून पाहिले असून, त्यामुळे मोदी मला घाबरतात. सर्व काही मी पाहिले असून, मला त्यातील सर्व काही समजते. अनेक वर्ष ही सिस्टीम मी जवळून पहिली आहे. मोदी मला दाबू शकत नाही. या 90 अधिकाऱ्यांमध्ये तीन दलित समाजाचे आणि एक आदिवासी समाजाचे आहेत. यामध्ये ओपनमधील एकही अधिकारी मला दाखवून द्यावा. देशाची पॉलिसी हे 90 लोकं बनवतात. त्यात आणखी 200 ते 300 आणखी लोकं जोडून घ्या, तसेच 50 ते 60 अरबपती जोडून घ्या, ही खरी शक्ती आहे जे देश चालवत आहे. यातून तुम्ही कोणीही वाचणार नाही.'

Rahul Gandhi Live : 22 लोकांकडे देशाची संपत्ती, राहुल गांधींचा उद्योगपतींवर घणाघात

Rahul Gandhi Live : राहुल गांधींचा उद्योगपतींवर घणाघात करत म्हटलं की, 'देशात 22 अशी लोक आहेत, ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी देशातील 170 कोटी लोकांकडे आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र,10 दिवसांत एका लग्नासाठी विमानतळ सुरू होतो. लग्नासाठी विमानतळ सुरू करताय करा, पण देशातील इतर भागात देखील विमानतळ सुरू करा. या लोकांनी काय चुकी केली आहे.'

Rahul Gandhi Live Updates : 56 इंचाची छाती नाही, पोकळ - राहुल गांधी

Rahul Gandhi Live Speech : राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचाची छाती नसून पोकळ आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे.'

Rahul Gandhi Live at Shivaji Park : विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही - राहुल गांधी

Rahul Gandhi Live : ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

Rahul Gandhi at Shivaji Park : 22 लोकांकडे देशाची सर्व संपत्ती, राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi Live Updates : 22 लोकांकडे देशाची सर्व संपत्ती एकवटली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

Rahul Gandhi Live Updates : लग्नासाठी 10 दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरु झाला - राहुल गांधी

Rahul Gandhi Live Updates : लग्नासाठी 10 दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरु झाला. मग देशात इतर ठिकाणी विमानतळ बांधायला एवढा वेळ का लागतो, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

Rahul Gandhi Live Updates : मणिपूरमध्ये याच शक्तीने सिव्हिल वॉर सुरु केलं - राहुल गांधी

 Rahul Gandhi Live Updates : मणिपूरमध्ये याच शक्तीने सिव्हिल वॉर सुरु केलंय, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi Live : 56 इंचाची छाती नाही, तो केवळ पोकळ व्यक्ती : राहुल गांधी

Rahul Gandhi Live Updates : 56 इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Live Updates : भाजप एक फुगा, ज्यात आम्हीच हवा भरली; उद्धव ठाकरे लाईव्ह

Uddhav Thackeray Live Updates : भाजप एक फुगा, ज्यात आम्हीच हवा भरली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे


पाहा उद्धव ठाकरे लाईव्ह


Uddhav Thackeray Live Updates : उद्धव ठाकरे लाईव्ह

Uddhav Thackeray Live Updates : इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

INDIA Alliance Sabha Live Updates : हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन लाईव्ह

INDIA Alliance Sabha Live Updates : हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या इंडिया आघाडीच्या सभेत भाषण करत आहेत.

Mehbooba Mufti Live : इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही : मेहबुबा मुफ्ती

INDIA Alliance Sabha Live Updates from Shivaji Park : इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 2014 च्या निवडणुकीत 15 लाख अकाऊंटमध्ये येणार सांगून भाजपने मते मागितली, पण असं काही केलं नाही. 2019 च्या निवडणुकीत पुलवामा शहीदांच्या नावाने मते मागितली आणि काहीही केलं नाही, असं म्हणून मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

साथ लढे या अकेले लढे लेकीन लढना चाहीए : प्रकाश आंबेडकर 

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? 


- साथ लढे या अकेले लढे लेकीन लढना चाहीये
- ⁠काही कंपन्या आहेत की त्याच उत्पन्न २०० कोटी आणि इलेक्ट्रीकल बाॅन्ड हजार कोटी रुपये खरेदी करतात
- ⁠प्रियंका गांधी यांना माझी विनंती आहे की
- ⁠मोदी साहेब हिंदू धर्मात नाती महत्वाची आहे 
- ⁠आपल्या सोबत आपल्या पन्तीला घ्या 
- ⁠वैयक्तीक विषय आहे मात्र संस्कृती आहे 
- ⁠आरएसएस ने त्यांना सुचना करावी
- ⁠ ईव्हिएम संदर्भात मी २००४ पासुन मी लढत आहे
- ⁠ही मशीन अमेरीकेतून येत आहे
- ⁠निवडणुक पुर्वी आपण सर्वांनी घेराव घातला पाहिजे पेपर काऊंटिंग केली पाहिजे
- ⁠मी राहुल गांधी यांना विनंती करतो की तयानी हा मुद्दा घेतला पाहिजे 


Prakash Ambedkar speech Mumbai : प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? 


Tejashwi Yadav Speech Mumbai : तेजस्वी यादव यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

तेजस्वी यादव यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 


तेजस्वी यादव नेमकं काय म्हणाले? 



- मोदींची व्यक्तिगत नाही तर देश वाचवायचा आहे
- ⁠जयानी कधी तिरंगा फडकावला नाही त्यांना हरवायचे आहे
- ⁠आम्ही घाबरणारे नाही तर लढणारे लोक आहेत
- ⁠आमच्यासाठी नाही तर तुमच्या साठी लढणार
- ⁠लालूजी तयार आहेत त्यांना हरवण्यासाठी 
- ⁠यांच्या विरोधात लढताना त्यांचे केस पिकले
- ⁠मोदी खोटे बोलण्याची फॅक्टरी आहे
- ⁠ते होलसेलर आहेत आणि रिटेलर पण आहेत
- ⁠सत्तेमधये येऊ  नाही तर नाही येणार पण लोकांच्या मध्ये आपल्याला रहाव लागेल
- ⁠ मोहब्बतच दुकान खोलले आहे ते बंद करु नका कधी
- ⁠महाराष्ट्र सरकारमधये कोणी लीडर नाही तर डीलर आहेत
- ⁠मोदी जी गॅरंटी देतील ते द्या पण पहिली आमच्या चाच्याची गॅरंटी द्या
- बिहारमध्ये उपमुख्यमंत्री होतो त्या काळात पाच लाख नोकरी दिल्या 
- ⁠तुम्ही १० वर्षात तरी दिल्या का
- ⁠भाजपा भगावोदेश बचाओ 


Tejashwi Yadav Speech Mumbai : तेजस्वी यादव यांचे भाषण


Mehbooba Mufti Live : मेहबुबा मुफ्ती लाईव्ह

Shivaji Park Live Updates : इंडिया आघाडीच्या सभेतून मेहबुबा मुफ्ती लाईव्ह बोलत आहेत.

Shivaji Park Live Updates : शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या यात्रेचा समारोप

Rahul Gandhi Closing Rally in Mumbai : मुंबईतील शिवाजी पार्कात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. या निमित्ताने इंडिया आघाडी शिवाजी पार्कवरून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहे.

Prakash Ambedkar Live : सोबत असो वा नसो आपण एकत्र लढलं पाहिजे : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Live : सोबत असो वा नसो आपण एकत्र लढलं पाहिजे, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या सभेतून सर्व पक्षीय नेत्यांना केलं आहे. 

Prakash Ambedkar Live : इंडिया आघाडीच्या सभेतून प्रकाश आंबेडकराचं जनसंबोधन

Prakash Ambedkar Live Updates : इंडिया आघाडीच्या सभेतून प्रकाश आंबेडकराचं जनसंबोधन सुरु आहे.

Farooq Abdullah : ईव्हीएम मशीन चोर आहे : फारुक अब्दुल्ला

INDIA Alliance Sabha Live Updates : फारुक अब्दुल्ला म्हणाले की, ईव्हीएम मशीन चोर आहे. ईव्हीएम ⁠मशिन हटवा. ⁠जेव्हा आमचं सरकार येईल त्यावेळी मशिन नसेल.

Prakash Ambekar At Shivaji Park : प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थिती

Prakash Ambekar At Shivaji Park : प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या सभेला हजेरी लावली आहे.

AAP at Shivaji Park : सौरभ भारद्वाज काय म्हणाले ? 

INDIA Alliance Sabha Live Updates : आम आदमी पक्षाचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनाही यावेळी सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि इलेक्ट्रोरल बाँडवर त्यांनी मतं व्यक्त केली. सर्वांनी फेसबूक लाईव्ह करत इलेक्ट्रोरल बाँडबद्दल माहिती द्यावी.

Farooq Abdullah Live : फारुक अब्दुला लाईव्ह

Farooq Abdullah Live : शिवाजी पार्कातील इंडिया आघाडीच्या सभेला सुरुवात झाली आहे. फारुक अब्दुला लाईव्ह बोलत आहेत.

MK Stalin Live : एम. के. स्टालिन आणि फारुख अब्दुला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात

INDIA Alliance Sabha Live Updates : एम. के. स्टालिन आणि फारुख अब्दुला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात झाली. पुढचं सरकार आपलेच, केंद्रामध्ये पुढील सरकार इंडिया आघाडीचे असेल, असा विश्वास यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी व्यक्त केला.

Prakash Ambekar Live : इंडिया आघाडीच्या सभेसाठी प्रकाश आंबेडकर रवाना

Prakash Ambekar Live : इंडिया आघाडीच्या सभेसाठी प्रकाश आंबेडकर रवाना झाले आहेत.



INDIA Alliance Sabha Live Updates : इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी

INDIA Alliance Sabha Live Updates : राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते शिवाजी पार्कात उपस्थित आहेत.

Muslim Community at Shivaji Park : सभा सुरु असताना सभेसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवानी रोजा सोडला

Muslim Community at Shivaji Park : सभा सुरु असताना सभेसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवानी रोजा सोडला. शिवाजी पार्कात मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदाय दाखल झाला आहे.

Rahul Gandhi at Shivaji Park : राहुल गांधी, प्रियंका गांधी उद्धव ठाकरे यांचं स्मृतिस्थळावर अभिवादन

Rahul Gandhi Tribute to Balasaheb Thackeray : राहुल गांधी, प्रियंका गांधी उद्धव ठाकरे यांचं बाळासाहेब ठाकरेंना स्मृतिस्थळावर पुप्षांजली वाहत अभिवादन केलं.





Congress Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शिवतीर्थावर समारोप

Rahul Gandhi Live : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण भारतात सुरु होती. या यात्रेनंतर आज मुंबईतील शिवतीर्थावर सायं 7 वाजता भव्य समारोप सभा होणार आहे. या भव्य सभेत इंडियाची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 

Rahul Gandhi Live Updates :शिवतिर्थावरुन इंडिया आघाडी रणशिंग फुंकणार

INDIA Alliance Sabha at Shivaji Park : मुंबईतील शिवाजी पाक अर्थात शिवतिर्थावरून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. राहुल गांधी यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज शिवाजी पार्कवर समारोप होत आहे. या इंडिया आघाडीच्या शक्तिप्रदर्शनावर राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातील प्रत्येक घडामोडी लाईव्ह येथे पाहा



 

राहुल गांधींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुल वाहिली

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यांनी पुतळ्याला फुलं अर्पण केली. 

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तर, जशास तसे उत्तर देऊ , सावरकर प्रेमींचा इशारा

काँग्रेस नेते  राहुल गांधी यांची आज शिवाजी पार्क येथे सभा होत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सावरकर प्रेमींनी दिलाय. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सावरकर स्मारक परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढण्यात आलाय. 

Rahul Gandhi Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींची उपस्थिती

MVA Sabha : राहुल गांधींच्या आजच्या सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

Rahul Gandhi at Shivaji Park : शिवाजी पार्कवर राहुल गांधीची सभा

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे.

पार्श्वभूमी

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. राहुल गांधी सभेसाठी शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे दिग्गज नेत्यांनी सभास्थळी हजेरी लावली आहे. निवडणुकीपूर्वी इंडियाचं हे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.