रत्नागिरी : तुम्ही मतदानासाठी मतदान केंद्रावर (Election Booth) गेलात मात्र, मतदार यादीत तुमच्या नावाची मृत अशी नोंद असेल, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातही तीन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 7 मे रोजी, मंगळवारी राज्यासह देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. मात्र, एक महिला विचित्र कारणामुळे मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याची घटना घडली आहे. आपल्या नावासमोर मृत असा शिक्का पाहताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. यामुळे सरकारी कामकाजातील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.


महिला जिवंत असून देखील मतदार यादीत मृत नोंद


एका बाजूला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ती जिवंत असून देखील मतदार यादीमध्ये ती मृत असल्याची नोंद असल्याने त्या महिलेला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं आहे. ही घटना रायगड लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदार संघातील खेड शहरातल्या एलपी इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे.


मतदानाचा हक्क बजावण्यापासून महिला वंचित


महिला जिवंत असून देखील मतदार यादीत महिलेच्या नावावर डिलीटचा शिक्का होता. मतदार मयत असाल्याचा प्रशासनाकडे रेकॉर्ड असल्यामुळे महिलेला मतदान करता आलं नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील ही घटना समोर आली आहे. चुकीच्या रेकॉर्डमुळे खेडमधील महिला मतदानापासून वंचित राहिली. खेडमधील एल.पी. इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. संबधित महिलेने सर्व पुरावे दाखवून देखील महिलेला मतदानापासून वंचित ठेवलं गेलं.


जिवंत मतदाराची मृत अशी नोंद


महिला जिवंत असून देखील मतदार यादीत तिचे नाव डिलीट झाल्याचा शिक्का मारण्यात आल्याचं निदर्शनास आल्यानंतर, त्या महिलेने मतदान केंद्रप्रमुखाशी विचारणा केली असता ही व्यक्ती मयत झाली असून मतदान करता येणार नाही असं सांगण्याच आले. मात्र त्या महिलेने तिथे ओळखपत्र आणि मतदार यादी क्रमांक सांगून ही व्यक्ती मीच आहे, असं पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं. मात्र मतदार यादीत तुमचं नाव डिलीट असल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असा शब्दात मतदानाच्या केंद्रप्रमुखांनी महिलेला सांगितलं.


नेमकं काय घडलं?


सावित्री लक्ष्मण बिर्जे असं या महिलेचं नाव असून 32 रायगड लोकसभा मतदार संघाच्या 263 दापोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 257 खेड मधील मतदार क्रमांक 943 या मतदार यादीत त्यांचे नाव आहे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्या मतदान करण्यासाठी गेले असता मतदानाची ओळखपत्र असून देखील त्यांना मतदान करता आले नाही मतदान केंद्र प्रमुखांनी हे व्यक्ती मिळत झाल्याकारणाने मतदार यादीतून नाव डिलीट झाले असल्याचे सांगितले अखेरीस सावित्री बिरजे या मतदानापासून वंचित राहिल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : मतदाराने पेट्रोल टाकून EVM पेटवलं, माढ्यातील घटना; तरुण पोलिसांच्या ताब्यात