Eknath Shinde, Mumbai : "SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालिकांनी टीम सुरु कराव्यात. विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात.  दुर्घटना घडल्यानंतर बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत", अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज झाले असून मुख्यमंत्री शिंदेंनी मॉन्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. त्यानंतर सीएम शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या सूचना दिल्या?


हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात 69 ते 106 टक्के पाऊस होणार 


10 ते 100 जुन दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होणार आहे.


15 जुन पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाला सुरवात होईल.


मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेचा महाव्यवस्थापकांनी मॉन्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली.


उल्हास नदीवरील बदलापुर बॅरेज येथील ब्रिटीशकालीन पीअर्स हटविण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना (जेणे करून महालक्ष्मी एक्स. सारखी परीस्थिती येणार नाही)


आर्मी, नेव्ही, इंडियन (एअर फोर्स, कोस्टगार्ड यांनी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला.


प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात होणार चांगला पाऊस होणार राज्यातील सर्व अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकावेत. गुन्हे दाखल करा. अधिकृत होडींग्ज आहेत त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडीट करा.


मुंबईत MMRDA, रेल्वे यांच्या अखत्यारीत येणारे होर्डिंग्जसाठी मुंबई महापालीकेचा परवाना आवश्यक.


BMC, नॉर्म्स प्रमाणे होडींग उभारन्याच्या सूचना दयाव्यात.


राज्यात ४८६ ठिकाणे दरडप्रवण   स्पॉट आहेत. याठिकाणी संबंधित जिल्हाधिका-यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.


जलजन्य आजार साथीचे रोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. पुरेशी औषधे, गोळ्या यांचा साठा पुरेसा आहे.


मध्यप्रदेश संजय सरोवर अलमट्टी धरण यांच्याशी समन्वय ठेवा. म.प्र. तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांशी समन्वय ठेवा.


प्रत्येक धरणांची तांत्रीक तपासणी 31 मे पर्यंत पूर्ण होईल.


प्रत्येक धरणांच्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा 31 मे पर्यंत कार्यान्वित होईल.


वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरखीन रहावा यासाठी उर्जा विभागाने दक्षता घ्यावी.


संपर्क सुटलेल्या ठिकाणी, औषध पाणी धान्य पुरविण्यासाठण जिल्हाधिका-यांनी कार्यवाही करावी.


धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी, नागरीकांमध्ये जनजागृती करावी.


नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे


मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोल ना झाकण आणि गर्डर बसविण्यात यावे.


सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे..


मंत्री अनिल पाटील काय काय म्हणाले? 


मागचे अनुभव बघता ज्या ज्या आपत्ती येऊ शकतात याबाबत चर्चा झाली. कशी दक्षता घ्यायची यावर चर्चा झाली. संस्थांच्या माध्यमातून सर्व यंत्रणाबाबत कोणती सामग्री वापरता याबाबत चर्चा  झाली. एनडीआरएफ वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. एनडीआरएफची टीम पोहोचण्याच्या अगोदरची ज्या रेस्क्यू टीम असतात त्यांना सुद्धा ट्रेनिंग येणाऱ्या काळात दिले पाहिजे याबाबत आपण चर्चा केली. गावातील तरुण मंडळी एखाद्या घटनेकडे झपाट्याने पोहोचते त्यामुळे त्यांना माहिती आणि त्यांना साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिले पाहिजे जेणेकरून बचाव कार्य होईल आणि जीवितहानी टाळता येईल. प्री मान्सून, दुष्काळ, पाणी टंचाई याबाबत या आधीच चर्चा झालेली आहे. राज्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई दिसते तिथे एक लँडलाईन नंबर आणि हेल्पलाइन नंबर आपण दिलेला आहे. पाणी कमी पडू नये आणि त्या ठिकाणी योग्य व्यवस्था झाली पाहिजे या सूचना आम्ही दिल्या आहेत, असं मंत्री अनिल पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar: पुणे अपघात प्रकरणी अजित पवार खोटं बोलतात, त्यांची नार्को टेस्ट करा: अंजली दमानिया