पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये (Pune Kalyani Nagar Accident)    झालेल्या अपघातात दोन जणांचा जीव गेला. या अपघाताची चर्चा देशभरात झाली. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar)  हे या  प्रकरणापासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. अधिकाऱ्यांना कामाला लावणारे, सकाळी बैठका घेणारे अजित पवार पुण्याच्या  भयंकर घटना घडल्यानंतरही आपुण्यात फिरकले का नाहीत.  विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंना आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत.  त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्याच्या सापडले आहेत. अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार केलला फोन देखील वादग्रस्त ठरला आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania)  देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अंजली दमानियांनी तर थेट अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 


अंजली दमानिया म्हणाल्या,  अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते. खरंतर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता . पण इकड तिकडच्या गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडेसे बोलले . ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले.  त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं तेथे झाले नाही तर ते विरोधी पक्षावर देखील भडकतात. त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते. जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले. कालचा त्यांचा जो तोरा  होता त्यावरून मला असं वाटतं ते धादांत खोटे बोलत आहे त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.


अजित पवारांचा फोन जप्त करा : अंजली दमानिया


अंजली दमानिया  म्हणाल्या,  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात राहून पालकमंत्र्यांचा कंट्रोल खूप जास्त आहे. पुण्यातील दगड माती धोंडे जरी घ्यायचे असेल तरी ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घ्यावे लागतात. ससून रुग्णालय असो किंवा पोलीस यंत्रणा सगळीकडे अजित पवारांच्या जवळचे आहेत.  अजित पवारांचा फोन जप्त झाला पाहिजे मग ते कोणी असो उपमुख्यमंत्री का असेना...


अजित पवारांना चार दिवस चकार शब्द काढला नाही : अजित पवार


पालकमंत्र्यांना जिल्हास्तरावर अनेक गोष्टी सोडवता येतात. पालकमंत्री असताना एवढी मोठी घटना घडली त्यावर देशातून आणि परदेशातून लोकांनी आपली मते व्यक्त केली आक्रोश व्यक्त केला. मात्र पुण्याचे पालकमंत्री चार दिवस या घटनेवर एक प्रकार शब्द देखील बोलले नाहीत . जेव्हा ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीच फडणवीस पुण्यात पोहचतात पत्रकार परिषद घेतात पूर्ण कंट्रोल स्वतःकडे घेतात. निदान त्यांच्या बाजूला अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बसावं आणि कुठल्याही परिस्थितीत जो दोषी आहे त्याला शिक्षा व्हावी असं निदान त्यांनी बोललं पाहिजे होतं . पण चार दिवस चकार शब्द देखील अजित पवारांनी कुठेही काढला नाही.  चार दिवस ते माध्यमांपुढे आले नाहीत त्यांनी एकालाही त्यांचं जे मत होतं ते व्यक्त केलं नाही यात माझ्या मनात शंका आली. त्यानंतर जे जे घडलं  जुवेनाईस जस्टीसने असा विचित्र निर्णय देणे,  निबंध लिहा, ब्लडचे सॅम्पल,  त्याचा खोटा रिपोर्ट देणे हे सगळे त्या मुलाचे आई-वडील करू शकत नाही असं मला वाटतं , असे देखील अंजली दमानिया म्हणाल्या. 


हे ही वाचा :


Pallavi Sapele : तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशी कशी करणार? पल्लवी सापळे हसून म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा!