Shrikant Shinde, Thane : "मी 2014 मध्ये जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा  उमेदवार झालो, शिंदे साहेबांनी दिवस रात्र काम केलं. तेव्हा कल्याणमध्ये निवडणूक लढली आणि दीड लाखाच्या फरकाने जिंकलो. मी 27 वर्षांचा होतो,  पुन्हा त्याच लोकांनी मला साडे तीन लाखाने विजयी केलं. माझ्या कडे चॉईस नव्हती", असे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले. ठाण्यात (Thane) शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी गायक अवधुत गुप्ते(Avadhoot Gupte) यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. 


मी दुसऱ्यासाठी प्रचार करायला पण तयार आहे


श्रीकांत शिंदे म्हणाले, "गेल्या वेळेस एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केली. तेव्हा परिस्थिती वेगळी होती, राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काबिल होगा वो ही राजा बनेगा. आता या पक्षात कोणासाठी सर्वोच्च पद आरक्षित नाहीत. आधी असे होते, पण आता जो महेनत करेल तोच सर्वोच्च पदावर पोहोचेल. मी दुसऱ्यासाठी प्रचार करायला पण तयार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले. 


राजकारणाचा विचार केला नव्हता, एक हॉस्पिटल काढू प्रॅक्टिस करू असे मनात होते


शिंदे साहेबांना मी सतत लोकांमध्ये पाहिलं. शिवसेना कशी वाढेल यासाठी ते झटत राहिले, त्यामुळे भाषण करताना त्यादिवशी भावना उफाळून आल्या. शिंदे साहेबांनी जो संघर्ष केला त्यामुळे आज इथे आलोय. परिवाराला वेळ देता येत नाही. मी बाप झाल्यानंतर मला काही गोष्टी कळतं आहेत, मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मी कधीच राजकारणाचा विचार केला नव्हता, एक हॉस्पिटल काढू प्रॅक्टिस करू असे मनात होते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 


हत्तीने आपली चाल चालत राहावी, मागे कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नये. आपली योग्यता काय, आपला संबंध काय, आपलं बोलतो काय? शिंदे साहेब हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसाही म्हटली. नक्कीच साहेबांनी चांगले संस्कार माझ्यावर केले आहेत, लोकसभेत त्यामुळेच हनुमान चालीसा म्हणू शकलो,  त्यावेळी लोकसभेत भाषण करताना मी प्रश्न विचारला. त्यावर कोणीतरी ओरडले हनुमान चालीसा येते का? म्हणून मी लगेच सुरू केली, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Supriya Sule On BJP : भाजपा घर, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडत आहे, सुप्रिया सुळेंचा घणाघात