NCP Sharad Pawar and MNS, मुंबई : छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) आज रायगड आठवला, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. राज ठाकरेंच्या टीकेचा शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असूनही राज ठाकरेंचा मनसे पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजकीयदृष्ट्या नगण्य आहे. मनसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे महेश तपासे म्हणाले आहेत. ते मुंबई येथे बोलत होते. 






राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा समोर कडवे आव्हान उभे करणार 


महेश तपासे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP Sharad Pawar) कार्यकर्त्यांना एका नव्या राजकीय चिन्हाखाली एकत्र आणण्याची क्षमता पवार साहेबांमध्ये आहे. हे आज महाराष्ट्राने पहिले.राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने  यातून प्रेरणा घ्यायला हवी, असा खोचक टोला महेश तपासे यांनी लगावला. पवार साहेबांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा समोर कडवे आव्हान उभे करणार आहे. आमचे नवीन पक्ष चिन्ह तुतारी आज रायगडावर वाजली आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आज महाराष्ट्रने पाहिले, असेही तपासे पुढे म्हणाले.






तुतारी या चिन्हाचे रायगडावर अनावरण 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर शनिवारी (दि.24) अनावरण करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द शरद पवारही उपस्थित होते. यावरुन राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.  छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी टीका ठाकरेंनी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ajay Baraskar : मनोज जरांगेंसोबत कोअर कमिटीमध्ये होता, तर देहूहुन तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो का म्हणता? अजय बारसकरांनी थेट उत्तर टाळले!