Supriya Sule On BJP : भाजप घर, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरची फोडत आहे. विद्यार्थ्यांकडे पुरावे आहेत, असा घणाघात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Sharad Sule) यांनी केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणाची चौकशी करावी,असे आवाहनही सुळे यांनी केले. पुण्यात (Pune) महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी सुप्रिया (Sharad Sule) बोलत होत्या. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे आभार मला तीन वेळा निवडून देण्यात मोठं योगदान आहे. सोनिया गांधी या राज्यसभेवर जाणार असल्याने दुःख झालं. त्या एक उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या लोकसभेत नसल्याची उणीव मला आणि भाजपच्या चांगल्या खासदारांना वाटेल.


काँग्रेस मुक्त भारतऐवजी काँग्रेसयुक्त भाजप झालं आहे


पुढे बोलताना सुळे (Sharad Sule) म्हणाल्या, आता काँग्रेस मुक्त भारतऐवजी काँग्रेसयुक्त भाजप झालं आहे. आज सत्तेत आल्यावर सगळे बाहेरचेच दिसत आहेत भाजपसाठी लाठ्याकाठ्या खाल्लेल्या मूळ भाजप नेत्यांचं वाईट वाटत. काँग्रेस भवन ही फक्त इमारत नाही तर मंदिर आहे. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले अन आज ते त्यांच्या सोबत आहेत. आता भाजप भ्रष्टाचारी जुमला पार्टी झाली आहे, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी बोलताना केली. चव्हाणांवर भाजपने केलेले आरोप खरे होते की खोटे होते. जर खोटे असतील तर त्यांनी त्यांची माफी मागावी, असेही सुळे (Sharad Sule) म्हणाल्या. 


भाजपची देशात सत्ता आल्यावर  निवडणूक होणार नाही


 संजय राऊत आणि अनिल देशमुख यांचा अभिमान वाटतो. भाजपची देशात सत्ता आल्यावर  निवडणूक होणार नाही. देशात दडपशाही सुरु आहे. आम्ही कुणालाही घाबरणार नाही. ही सभा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र ,देश करण्याची नांदी आहे. संघर्षात मज्जा आहे. आम्हाला चिन्ह देवू नका असा वकिलांचा युक्तिवाद होता पक्ष ही देवू नका मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितला की पक्ष ही मिळेल आणि चिन्ह ही मिळेल. चांगलं आणि ऐतिहासिक चिन्ह मिळालं. आजपासून आपण लोकसभेच्या तयारी करुयात, असेही सुप्रिया सुळे (Sharad Sule) यावेळी बोलताना म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on PM Modi : शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल, शरद पवारांनी मोदी सरकारविरोधात 'तुतारी' फुंकली