Eknath Shinde on Shrikant Pangarkar : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांच्यावर शिवसेनेच्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. शिंदेच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश पार पडला होता. मात्र, गौरी लंकेश हत्येप्रकरणातील आरोपीला संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिल्याने चारुबाजूंनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका झाली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. "शिवसेना पक्षाचे मुख्य नेते  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे जर कोणते पद देण्यात आले असेल तर त्या पद नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे".






श्रीकांत पांगारकर यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती


अर्जुन खोतकर याच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला होता


ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत पांगारकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता


पांगारकर हे तीन वर्षापासून या प्रकरणात तुरुंगात होते


जालना विधानसभा प्रमुख पदी पांगारकर यांची नियुक्ती करण्यात आली होती


पत्रकार गौरी लंकेश यांनी 2017 मध्ये हत्या 


पत्रकार गौरी लंकेश यांची 2017 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणात श्रीकांत पांगरकर याने 3 वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता. दरम्यान, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला.  पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. श्रीकांत पांगारकर याने जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, सर्व बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर त्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!


Santosh Bangar : मतदारांना 'फोनपे'वरुन पैशाची व्यवस्था भोवली, आमदार संतोष बांगरांवर अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; एबीपी माझाचा दणका