Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंनी अमित शाहांपुढे महायुतीच्या अडचणींचा वाचला पाढा; दिल्ली दौऱ्याची Inside Story
Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा चर्चेत आहे.

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे वाचल्याचं सांगण्यात येतंय.
📍नवी दिल्ली |#दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.@AmitShah यांची सदिच्छा भेट घेतली. देशाच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे देणारे देशातील पहिले गृहमंत्री ठरल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2025
उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत #शिवसेना… pic.twitter.com/jN7MKHTv5I
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटं एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनासोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सुनबाई हजर होत्या. एकनाथ शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली. ऑपरेशन महादेवच्या यशामुळे शंकराची प्रतिमा नरेंद्र मोदींना भेट दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
📍नवी दिल्ली |#दिल्ली दौऱ्यावर आलो असता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.@narendramodi जी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2025
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आलो असता आज ही भेट संपन्न झाली. यावेळी मोदीजींना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित… pic.twitter.com/PoaM05Ovkb
महायुतीतल्या अडचणींच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा-
महायुतीतल्या अडचणींच्या मुद्द्यावर यावेळी एकनाथ शिंदेंनी अमित शाहांशी चर्चा केल्याचं समजतंय. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शाहांनी यावेळी दिलं. अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
























