एक्स्प्लोर

आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला एकनाथ शिंदे अनुपस्थित, दरेगावातून अजितदादांना पत्र लिहित म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी चर्चा रंगली होती .मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)दरेगावात असल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते

Eknath Shinde Letter to Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला .या सत्काराची सध्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा आहे .या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंचं नाव अग्रस्थानी असल्याने मोठी चर्चा रंगली.  दरम्यान, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी चर्चा रंगली होती . मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)दरेगावात असल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलगिरीचे पत्र लिहिले आहे . या पत्रात कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत . उपस्थित राहू शकत नसल्याचे कारणही त्यांनी पत्रात दिले आहे . 

एकनाथ शिंदेंची पत्रातून दिलगिरी

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांतर्गत कुरबुरी सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार का ? याची उत्सुकता असताना एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय .महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या महापर्यटन महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांचा कार्यक्रम तसेच श्री श्री रविशंकर यांच्या जलतरा प्रकल्पाचे उद्घाटन असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले आहे .कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवत त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली आहे . 

गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमाची चर्चा रंगली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज (3 मे) गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी याआधी देखील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ते एका मंचावर, एका कार्यक्रमासाठी अनेकदा  एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यांनी साताऱ्यामध्ये एका बैठकीला शेजारी- शेजारी बसलेला आणि शरद पवारांनी अजित पवारांना बैठकीत आकडेवारी वाचताना मदत केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.

दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सत्काराचे निमंत्रण देण्यात आलं होतं . त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची मोठी चर्चा आहे . महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीत गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी उत्सुकता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली . मात्र, महाबळेश्वरमध्ये असणाऱ्या कार्यक्रमामुळे गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलगिरीचं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं आहे.

हेही वाचा:

Nana Patekar : एकनाथ शिंदे असे मित्र, ज्यांच्यावर एकही डाग नाही; नाना पाटेकरांकडून शिंदेंचे तोंड भरून कौतुक

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TV Actress Struggle Life: वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
Embed widget