एक्स्प्लोर

Nana Patekar : एकनाथ शिंदे असे मित्र, ज्यांच्यावर एकही डाग नाही; नाना पाटेकरांकडून शिंदेंचे तोंड भरून कौतुक

Nana Patekar On Eknath Shinde : मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही तुमच्यावर कोणीही बोट दाखवू शकत नाही यापेक्षा दुसरं काय पाहिजे अशा शब्दात नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं. 

सातारा : राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.  काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशन, (Naam Foundation) टाटा मोटर्स (Tata Motors) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. 

काय म्हणाले नाना पाटेकर? 

नाना पाटेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे." 

धरणातील गाळ काढला पाहिजे

नाना पाटेकर पुढे म्हणाले की, "नाम  फाउंडेशनचा टाटा समूह आणि  आणि राज्य सरकार सोबत करार झाल्याने आमचे काम अधिक सोयीचे झाले आहे. धरणातून गाळ काढल्यास आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापरल्यास शेतीची सुपिकता वाढते. माझ्या खडकवासल्यातील शेतीमध्ये याचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पाण्याचा साठाही वाढतो आणि शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल. 

कोयना धरणातील गाळ काढण्याचे काम पुढच्या वर्षी अधिक प्रमाणात सुरू करावे असे आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. 

नाम फाऊंडेशनच्या मदतीने धरणातील गाळ काढणार

एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. नाम फाऊंडेशनच्या वतीने राज्यभरात हे काम सुरू आहे. चिपळूण, महाड आणि खेडमध्ये याचे परिणाम दिसतात. त्यामुळे पुराती तीव्रता कमी झाल्याचं दिसतंय. कोयना धरण आणि बॅक वॉटर परिसरातली त्याचे सकारात्मत परिणाम दिसत आहेत. याची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे. धरणाचा गाळ काढणे याला पर्याय नाही. त्यावर मागच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यासाठी वेगवेगळे विभाग आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम केलं जाणार आहे."

सिनेमा बघायला वेळ मिळत नाही. पण नाना हे आवडते अभिनेते आहेत. त्यामुळे कोविड झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना नानांचे चित्रपट पाहिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
Embed widget