Eknath Shinde : ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं, त्यांचाही अपमान करताय, जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला
Eknath Shinde : ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं, त्यांचाही अपमान करताय, जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला

Eknath Shinde on Uddhav Thackeray, Kokan : "ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं, त्यांचाही आपण अपमान करताय. जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा. दिवसा, रात्री आणि स्वप्नात देखील तुम्हाला एकनाथ शिदेंचं दिसतो", असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. ते कोकणातील एका राजकीय कार्यक्रमात बोलत होते.
राज्यानेच नाहीतर जगातील 32 देशाने आमच्या बंडाची नोंद घेतली - शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, संताजी आणि धनाजी जसं मोगलांना दिसायचे. तसं तुम्हाला एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो. माझ्यावर कितीही आरोप करा, कितीही शिव्या द्या. परंतु या एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंती नाही. मी कोणालाही घाबरत नाही. तुम्ही दोन-अडीच वर्षांपूर्वी पाहिलं. या राज्यानेच नाहीतर जगातील 32 देशाने आमच्या बंडाची नोंद घेतली.
होती दाढी म्हणून उद्धस्त झाली तुम्ही आघाडी - एकनाथ शिंदे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राजन साळवी देखील अडीच वर्षापूर्वी यायला पाहिजे. आज ते शिवसेनेत आले. खऱ्या अर्थाने कोकणात चांगले कार्यकर्ते शिवसेनेत आले. ज्यांच्या विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहिलं राजन साळवी. ...तुम्हाला लोक का सोडून जात आहेत, त्याचं आत्मचिंतन करा. मनगटात ताकद लागते. यांच्या मनगटात ताकद लागते. हे शोले सिनेमाताली जेलर सारखं सुरु आहे, अर्धे तिकडं जावा, अर्धे इकड जावा आणि उरलेले माझ्या पाठिमागे या.... पाठिमागे पाहिलं तर कोणीच नाहीये. कशाला उगाच मोठ्या बाता मारताय. होती दाढी म्हणून उद्धस्त झाली तुम्ही आघाडी...हे या दाढीने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी दाखवलंय, कशाला माझ्या नादाला लागताय...असा इशाराही शिंदेंनी दिला.
◻️LIVE 📍चंपक मैदान, रत्नागिरी
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 15, 2025
🗓️ 15-02-2025
📹🚩 जाहीर आभार सभा - लाईव्ह
https://t.co/p8TESlY4gR
इतर महत्त्वाच्या बातम्या
























