Eknath Shinde in Kolhapur : "लोकसभेला खोटं बोलून फसवलं आता लोक फसणार नाही. एक बार मैने कमेटमेंट किया तो मै खुद की भी नहीं सूनता! प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे. सगळ्यात जास्त मताधिक्य आबिटकर यांना द्या मी त्यांना मंत्री करतो", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात केली आहे. राधानगरी - भुदरगड तालुक्यातील शासकीय इमारती व विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन तथा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. 


सरकार आल्यानंतर लाडकी बहीणच्या पैश्यांमध्ये वाढ करु 


आमदार कसा असावा याच उदाहरण म्हणजे प्रकाश आबिटकर आहेत. प्रकाश आबिटकर यांनी कधीच मला वैयक्तिक काम मला सांगितलं नाही. जे मागितलं ते या जनतेसाठी मागितलं आहे. आज इतकी उदघाटन केली की सगळे बॅकलॉग भरून काढला. एकही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री देतो. ही योजना सुरू केली त्यानंतर अनेकांच्या पोटात दुखू लागले. काहीजण कोर्टात गेले, अरे तुमच्या पोटात का दुखतं, तुमच्या बापाचं पैसे आहेत का? ही लाडकी बहीण योजना बंद करणारा जन्माला आला नाही. सरकार आल्यानंतर या पैशात आम्ही वाढ करू. आधी होते ते माझं काय बघणारे होते आम्ही तुमचं काय याचा विचार करतो, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. 


लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालण्याऱ्यांना जोडा दाखवा


एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीच्या योजनेत ज्यांनी खोडा घातला त्यांना जोडा दाखवा. तुम्हाला जर शक्तीपीठ नको असेल तर तो आम्ही करणार नाही. तुमच्या इच्छेच्या विरोधात कोणताही निर्णय नाही. आता शब्द देतो की शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. दिलेला शब्द पालन हे माझ्या रक्तात आहे. मुला- मुलींच्या मोफत शिक्षणासाठी सरकारने निर्णय घेतला. इंजिनिअर व्हा, डॉक्टर व्हा मोठे व्हा.


पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही फक्त घोषणा करत नाही. घोषणा पूर्ण केली की विरोधकांच्या पोटात गोळा येतो. प्रकाश आबिटकर यांच्या समोर उभा राहील त्याचे डिपॉझिट जप्त होईल. सगळे विकास प्रकल्प बंद होते ते आम्ही सुरू केले. जर आम्ही बंड करून वेगळा निर्णय घेतला नसता तर आज जी उद्घाटन झाली ती झाली नसती. बाळासाहेब, दिघे साहेब म्हणायचे की शिवसैनिक हा घरात नाही तर जनतेच्या दारात शोभून दिसतो. 24 तास पेक्षा जास्त दिवस असता तर तो दिवस देखील मला कमी पडला असता. मी दिवसाचे 18 ते 20 तास काम करतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस