Eknath Shinde in Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून गेलेले पाहायला मिळाले आहेत. शिंदे यांनी ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला रुग्णालयात पोहोचवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः  धावून गेले. 


मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर शिंदेंचा ताफा कळव्याकडे निघाला


शहरात आज (दि.20) मे निमित्त सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 




महिलेने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार 


मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्याना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्याना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.






इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates: राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 27.78 टक्के मतदान, दिंडोरीत मतदानाचा सर्वाधिक टक्का; दक्षिण मुंबईत मतदारांचा निरुत्साह