Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदान प्रक्रिया (Voting Process) सुरळीत पार पडावी यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या टप्प्यात मुंबईत (Mumbai Lok Sabha Election 2024) पाच टप्प्यात मतदान पार पडतंय. अशातच मुंबईतील वर्सोवामध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि ठाकरे गटात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाल्यानंतर मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी केंद्रावरुन बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. 


भाजप-ठाकरे गटात शाब्दिक चकमक 


वर्सोवा मतदान केंद्रावर भाजप आणि ठाकरे शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदान केंद्रावर येऊन प्रचार करत आहेत, असा आक्षेप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. आम्ही प्रचार करायला नव्हे तर मतदारांना मदत करायला आलो आणि हा गुन्हा आहे का? असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.