मुंबई : भाजपमधील (BJP) अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या चर्चेचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यासाठी प्रचार केला होता. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णीही लागली. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यातच आता एकनाथ खडसे यांचे माधुरी मिसाळ यांच्या सोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 


'मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट'


एकनाथ खडसे आणि माधुरी मिसळ यांची भेट झाली. यावेळी दोघांमधील चर्चा रेकॉर्ड झाली आहे.  यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसळ यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. या संभाषणावेळी आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नक्की कोणाला उद्देशून केले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. 


एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी? 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि एकनाथ खडसेंनी भेट घेतल्याने एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


PM Modi Oath Ceremony : सुनबाईला मंत्रि‍पदाची लॉटरी, सासरे एकनाथ खडसेंचे डोळे पाणावले; म्हणाले...


Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास