एक्स्प्लोर

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा, मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ?

Manikrao Kokate Arrest Warrant: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Manikrao Kokate Arrest Warrant: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे  (Manikrao Kokate Arrest Warrant) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत तातडीच्या सुनावणीची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. 
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे हायकोर्टात जात आहेत. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई नाही अशी माहिती समोर आली आहे. 

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव 

माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तातडीच्या सुनावणीची मागणी करणार आहे. कोकटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं असताना कोकटेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिक्षेवर स्थगितीची याचिकेत मागणी देखील करणार आहे. माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्याची देखील न्यायालयाला माहिती दिली जाणार  आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय सदनिकेच्या लाभ घेण्याप्रकरणी अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा न मिळाल्यास कोकटेंच्या अडचणी वाढणार आहेत.

Manikrao Kokate Arrest Warrant: ...तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित: सूत्रांची माहिती

माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोकाटे यांना अटक वाॅरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?

Embed widget