मुंबई : याआधी 2014 ते 2019 या काळात चार वेळा महाराष्ट्र पालथा घातला, आता माझ्या सर्दी पडशाची आठवण तुम्हाला आली, पण अजित पवारांच्या (Ajit Pawar) पायाची शपथ घेऊन सांगतो आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा शब्द धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला. ते राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात (NCP 25th Foundation Day) बोलत होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना वरिष्ठ नेत्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. धनंजय, आता तुझ्या सर्दी पडशाचं निमित्त चालणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले. त्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट अजित पवारांची शपथ घेऊन त्यांना महाराष्ट्र पालथा घालण्याचं आश्वासन दिलं.
सर्दी-पडसं झालं तरी थांबणार नाही
धनंजय मुंडे म्हणाले की, आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल, पण 2014-2019 या काळात मला ना सर्दी होती ना पडसं होतं. पण आता दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, विधासभेलाच नव्हे तर तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका असो वा नगरपरिषद, जोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी-पडशाचा तुम्हाला त्रास होणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन.
त्यावेळी सर्दी पडशाची आठवण झाली नाही
या निवडणुकीत काही ही झाल तरी येणारी वेळ ही घड्याळाचीच असेल. गेल्या 25 वर्षांत लोकांची सेवा करण्यात सिंहांचा वाटा हा दादांचा आहे. 2014 मध्ये पराभव होण्याऱ्यांत मीही होतो. त्यावेळी दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली. तर दुसरीकडे दादांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत होता. कोणाच्या सांगण्यावरुन केलं हे आता सांगायची गरज नाही. 2014 ते 2019 या काळात मी तीन वेळा महाराष्ट्र पालथा घातला. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्यांना आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो असा विश्वास दिला. त्यावेळी माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली नाही. पण आज माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल.
मी तुम्हाला आजच सांगतो, अगदी जिल्हा परिषद निवडणूक असली तरी मी थांबणार नाही. जर कोणत्या सहकाऱ्याच्या नाकाला धार लागली तरी रुमाल घेऊन मी असेन. बारामतीची जागा हरलो तरी याचं फार दुःख करु नका. कारण विकास आणि सहानुभुतीचा तराजू जर केला तर सहानुभूतीच दाखवेल. त्यामुळे याच शल्य पूर्णपणे विधानसभेला भरुन काढू.
मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची दादा तुम्हीच वाढवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाचा जमाना आहे. मात्र सोशल मीडियावर अवलंबून राहता येणार नाही, तर घराघरात पक्ष पोहचावा लागेल असं धनंजय मुंडे म्हणाले.
ही बातमी वाचा: