Loksabha Election Result News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर राज्यभरात महायुती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच उत्सव साजरा गेला. हाच आनंद साजरा करत असताना काही अज्ञातांनी अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आलाय.
या संपूर्ण प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केलाय. ही घटना रविवारच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी आज काँग्रेसकडून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली असून बॅनर फाडणाऱ्याला तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी कोतवाली ठाण्यात काँग्रेस शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. परिणामी पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 जणाविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या प्रकरणामुळे शहरात काही काळ तनाव निर्माण झाला असल्याचे बघायला मिळाले.
महाविकास आघाडीचे पोस्टर फाडने भोवलं
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी निमित्त काल अमरावतीत (Amravati Lok Sabha Constituency) भाजप तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला होता. दरम्यान महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडन्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात सिटी कोतवालीचे अजय जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 ते 25 जणाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
मात्र या प्रकारामुळे शहरात काहीकाळ तनाव निर्माण झाला होता. तर हे कृत्य भाजपकडून करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच कायदा सुव्यवस्था बाधित होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या