Sunil Tatkare, Mumbai : तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केला आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP Ajit Pawar) 25 वा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी ते बोलत होते.
आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात
सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, 25 वर्षांपासूनचा संघर्ष पाहातोय. स्वाभिमानाच्या मुद्यावर लढलो. शिवाय त्या कालावधीमध्ये परकिय नागरिकाचा मुद्दाही त्या कालावधीमध्ये होता. राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदलावी लागते. परंतु घेतलेल्या भूमिकेत देखील बदल करावा लागतो. हे पक्षाच्या स्थापनेनंतर काही कालावधी लक्षात आलं. ज्या पक्षापासून फारकत घेतली, विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या. शिवसेना, भाजपने केली नसेल तेवढी टीका त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली. त्यावेळी निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले होते. आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात, अशी टीका सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रोहित पवारांवर केली.
मुख्यमंत्रिपदाची संधी घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती
पुढे बोलताना तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, अजित दादा तुमचा स्तुतीपाठक त्यावेळी नव्हतो आणि आता ही नाही. मात्र तुम्ही पायाला भिंगरी बांधून संघटना बांधली. भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असत तर पक्ष फुटला असता असं सांगितल गेलं. नेतृत्वाने ही भुमिका घेतली होती. सर्वात जास्त मत त्यावेळी भुजबळ यांना पडली होती. आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्रिपद घ्यायचं नव्हतं, मात्र प्रफुल भाई तुम्हाला ही घ्यायचं नव्हतं असा समज होता. दादा तुम्ही राज्यमंत्री असताना तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला जाणवल की वेगळं रसायण आहे. पवार साहेब ही 72 व्या वर्षी केंद्रात मंत्री झाले. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती ती जर घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती. 2014 मध्ये बाहेरुन पाठिंबा दिला होता. 2009 साली ही भाजप सोबत जाण्यासाठी प्रत्येकी 16 जागांचा फॉम्युला ठरला होता, असा दावाही सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Anna Bansode: शिंदे गटाची एका राज्यमंत्रीपदावर बोळवण, अजित पवारांना काहीच नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने मनातील खदखद बाहेर काढली