Dhananjay Munde, Speech : "छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्या वेळेपासूनचा गावगाडा पाहा. 18 पगड जातीचे लोक एकत्रित गुण्या गोविंदाने राहतात. पण बीड जिल्ह्यामध्ये खालच्या पातळीवर जाऊन द्वेष केला जातोय. आम्ही बहिण- भाऊ गाडीमध्ये येत असनाता छत्रपती उदयनराजेंच्या साक्षीने बोलत होतो. एवढा द्वेष होत असेल तर आमच्या सारख्याला सुद्धा राजकारण, समाजकारण करावे की, नाही? असा प्रश्न पडतो. अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जातीत जन्माला आलो त्यात आमचा काय दोष आहे?", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते उदयनराजे भोसलेही (Udayanraje Bhosale) उपस्थित होते. 


कुटुंबातील मोठा म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे


धनंजय मुंडे म्हणाले, आज स्वर्गीय मुंडे साहेब नाहीत. स्वाभाविक आहे की, कुटुंबातील मोठा म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. गावात गटातटातील राजकारणे असते. ही गटातटाची आणि लोकसभेची निवडणूक आहे. प्रारब्ध आपण भोगलाय. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही प्रीतम मुंडेंना 10 वर्षे खासदार केलं. तुम्ही मंत्री होऊन जिल्ह्याचा विकास केला, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 


ही निवडणूक फक्त जातीपातीच्या राजकारणावर गेली


धनंजय मुंडे म्हणाले, मला वाटत होते की या बीड जिल्ह्याची निवडणूक विकासावर व्हावी. दुःखाने आणि खेदाने व्यक्त व्हावे लागत आहे की, ही निवडणूक फक्त जातीपातीच्या राजकारणावर गेली. विकास करताना आम्ही कधी जात बघत नाहीत मग आज मतदान देताना का जात बघता? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला. 


पंकजा ताई तुम आगे बढो म्हणण्यासाठी उभा आहे


पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 2009 मध्ये मी तुमच्या जीपवर उभा टाकून पंकजा ताई तुम आगे बढो म्हणलो होतो. आज पुन्हा 2024 मध्ये पंकजा ताई तुम आगे बढो म्हणण्यासाठी उभा आहे. किती हो आमच्या ताईची भीती. आमच्या नेत्याला तीन दिवस जिल्ह्यात येवून बसावे लागले. आज प्रचार संपत आलाय आज तरी पत्रकारांनी पवार साहेबांना विचारा की मराठा आरक्षण वर तुमचे मत काय? असंही मुंडे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar : शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे येत असतील, तर आपण सहकार्य करावं : शरद पवार