Dhananjay Munde on Bajrang Sonwane and Sharad Pawar, Beed Meeting : "खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जात नाही. पुष्पा 2 आला पुष्पा 3 कधी येणार? घाबरु नका आता  वन, टू नाही तर सिरीज येणार आहे. नेटफ्लिक्सवर येणार काळजीच करायची नाही", असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना टोला लगावलाय. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका चंदन तस्काराचा पर्दाफाश झाला होता, त्यावरुन बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप होऊ लागले. यावरुनच मुंडे यांनी सोनवणेंवर निशाणा साधलाय. 


धनंजय मुंडे म्हणाले, या लोकसभेच्या निवडणुकीत मी 10 मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने गेलो. विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होते. पण एकमेव बीड जिल्हा आहे, जिथे विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढली जात नाही. याठिकाणी जात-पात आणि धर्माच्या नावावर निवडणूक लढवली जात आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला जात-पात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायची शिकवण दिली नाही. कदाचित हेच सांगायला उदयनराजे भोसले इथे आले असतील, असंही मुंडे यांनी सांगितलं. 


 शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार जमा केले


पुढे बोलताना मुंडे म्हणाले, अनेक जाती धर्मातील लोकांना मुंडे साहेबांनी आपलंस केलं, त्यांचं नेतृत्व समोर आणलं. ही निवडणूक लोकसभेची आहे. ग्रामपंचायतीची नाही. बहुरंगाच्या ग्रामपंचायतीची तर बिलकुल नाही. बरं असलं तरी कशी आत्ताच पडली. 200 मताने गावात पडला आहे. केंद्रातील सरकारने राशन देताना कोण कोणत्या जातीचा आहे, याचा विचार केला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार जमा केले. त्यांनी जात-धर्म पाहिला का? मग आज बीड जिल्ह्यात विकासाच्या मुद्यावर निवडणूक का लढली जात नाही. 


 महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात मिळाले


22 वर्ष मी ही मराठा आरक्षणाच्या चळवळीतील कार्यकर्ता आहे. आरक्षणाचा मुद्दा राहिलाच नाही. पहिल्यांदा मागणी होती, निजामकालीन दस्ताप्रमाणे आरक्षण द्यावे. महायुती सरकारने मागणीचा सन्मान केला. निजामकालीन दस्ताप्रमाणे आरक्षण दिलं. प्रमाणपत्र दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात मिळाले. पहिलं कुणबी प्रमाणपत्र कोणी घेतलं असेल तर स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवणाऱ्या एकाने घेतलं. माझ्यासारखा असता तर समाजातील गरिबाला काढून दिलं असतं. याने निवडणुकीसाठी प्रमाणपत्र काढलं. पवार साहेब बीड जिल्ह्यात येणार आहेत. तेव्हा बीड जिल्ह्यातील जनतेने त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका नेमकी काय? हे विचारलं पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरेंसह बडे नेते जेलमध्ये जाणार, अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने खळबळ