मुंबई विधीमंडळात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.  उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत  पाटलांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत  केलं. स्वागत केल्यानंतर   चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे नेते अनिल परबांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केलं.  दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  यावर कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.  


अतुल भातखळकर म्हणाले,  विधानपरिषदेचे अधिवेशन सुरू झाले आहे आणि उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने एकमेकांसमोर आले. समोरसमोर आल्यानंतर ऐकमेकांशी बोलणे ही आपली संस्कृती आहे आणि हा आपल्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. 


राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : अतुल भातखळकर


अनिल परबांना दिलेल्या शुभेच्छांवर भातखळकर म्हणाले,   काल मतदान पूर्ण झाले.  मतदान होईपर्यंत आम्ही प्रचंड ताकदीने काम केले आहे. समोर अनिल परब भेटले असतील तर शुभेच्छा दिल्या असतील.  यात वेगळे काही घडले असे वाटत नाही. कोणताही राजकीय अर्थ करण्याची गरज नाही.


फडणवीस मोठ्या मनाचे नेते : अतुल भातखळकर


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टन प्रवास केला यावर बोलताना भातखळकर म्हणाले,    खालच्या स्तरावर जाऊन टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यातून फडणवीस हे किती मोठ्या मनाचे आहे हे दिसून येते. फडणवीसांच्या जागी दुसरा कोणता नेता असता तर त्याने रिअॅक्शन दिली असती. पण उद्धव ठाकरे हे किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. तरीसुद्धा  आपण आपली मर्यादा आणि सज्जनशीलता सोडायची नसते याचेच एक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले आहे. अटलजी कायम म्हणायचे की समोरचे विरोधक हे माझे शत्रू नाहीत  विरोधक आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्याच विचारावर चालणारे नेते आहेत. 


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास


आज विधिमंडळात एकाहून एक धक्कादायक घटनांचा सिक्वेन्स पाहायला मिळाला. विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील तोंडदेखला का होईना पण झालेला संवाद हा महत्त्वाचा मानला जात आहे.