Devendra Fadnavis Weight loss : तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Weight loss) यांच्या पर्सनॅलिटीचं गेल्या काही वर्षात निरीक्षण केलं असेल तर एक बाब निश्चितपणे लक्षात येईल. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी फिटनेसवर कमालीचं लक्ष दिलंय. (Devendra Fadnavis Weight loss) मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही वर्षात 5-10 किलो नव्हे तर जवळपास 25 किलो वजन कमी केलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी वजन कशाप्रकारे कमी केलं? याबाबत डॉक्टर जयश्री तोडकर यांनी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे. जयश्री तोडकर या Bariatric Surgeon आहेत. त्यांनी माझं वजन कमी केलंय, असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 

Continues below advertisement

फिटनेसवर लक्ष देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रामाणिक प्रयत्न - जयश्री तोडकर 

डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस सर प्रामाणिक पेशंट आहेत. पेशंट म्हणता येणार नाही. पण sincere व्यक्ती आहेत. त्यांना आम्ही सांगितलेल्या गोष्टी 80 टक्क्यांहून चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या. त्यांच्यामध्ये फिटनेसबाबत स्ट्राँग इच्छा होती. मी नवीन जबाबदारी हाती घेत आहे, अशावेळी आपण फिट असायला हवं, याचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं. त्याबाबत मी त्यांना खूप मार्क देईन. कारण या गोष्टी एखादी व्यक्ती स्वत:हून ठरवत नाही, तोपर्यंत ती या गोष्टी फॉलो करत नाही. त्यांना आम्ही जे सांगितलं ते खूप अवघड असं सांगितलं नाही. खूप साध्या गोष्टी सांगितल्या. 

जयश्री तोडकर डाएटबाबत काय म्हणाल्या?

पुढे बोलताना जयश्री तोडकर म्हणाल्या, आमची एक पद्धत आहे. आम्ही Good, Bad, Ugly अशा तीन पद्धतीने लोकांना अन्न पदार्थांची कॅटेगिरी सांगतो. यातील Good तुम्ही 80 टक्क्यांहून जास्त फॉलो करा. आपलं आयुष्य असं आहे की, प्रत्येक ठिकाणी प्रलोभणं आहेत. भारतासारख्या देशात पदार्थांची विविधता आणि चव देखील खूप आहे. अशा वेळी आपण त्यांना सांगू शकत नाही की, एकाच पद्धतीचं फॉलो करा. आम्ही त्यांना 15 ते 20 टक्के प्रमाणात Bad फुड मजा म्हणून किंवा गंमत म्हणून ठीक आहे, असं सांगितलं होतं. Ugly फुड हे केवळ कोपऱ्यात ठेऊन द्या ..ते फक्त 2 ते 5 टक्के खाल्लं पाहिजे. आम्ही हा डाएट प्लॅन आखून दिला होता, तो त्यांनी चांगल्या पद्धतीने फॉलो केला. 

Continues below advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वजन वाढल्यानंतर चारी बाजूंनी ट्रोलिंग, बिपाशा बासूने अखेर प्रतिक्रिया दिली, म्हणाली...

सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती