एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान 70 किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे,असं म्हटलं आहे. 

मुंबई: 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान 70 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणाऱ्या 36 किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती 50 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान 50 टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मेट्रो मार्गिका 2-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यतेनुसार रविवारी 12 तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा. या कामामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी 31 मे 2027 पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा. कोणताही नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आगाऊ नियोजन करावे. वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधावा. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधा घटकांचे अद्ययावत ‘ मॅपिंग ‘ करावे. नागरी सुविधा किंवा पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध होऊन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होईल, अशी यंत्रणा विकसित करावी. पायाभूत सुविधांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक फलक, बॅरिकेड्स आणि अन्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात. प्रकल्पस्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करणारी स्वतंत्र कंपनी निर्माण करून या सेवांसाठी अत्यल्प दराचे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.

छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराला नळजोडणी द्यावी

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घ्यावी. नळ जोडणी देताना पुन्हा खोदकाम करावे लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करावे. यंत्रणांनी कंत्राटदारांकडून केवळ पुरेसे काम करून न घेता निर्धारित उद्दिष्ट साध्य होईल, अशा पद्धतीने प्रकल्प पूर्ण करून घ्यावेत. कामामध्ये विलंब तसेच पूर्णत्वाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही काम पूर्ण न होणाऱ्या प्रकल्पांच्या कंत्राटदारांवर काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मेट्रो मार्गिका क्रमांक सहा मधील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान जमिनीच्या ताब्याबाबत व न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (पाणीपुरवठा) पराग जैन आदी उपस्थित होते.

या कामांचा घेतला आढावा

शिवडी ते वरळी उन्नत रस्ता जोडणी, मेट्रो मार्गिका क्रमांक नऊ दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर, मेट्रो मार्गिका क्रमांक पाच ठाणे ते धामणकर नाका आणि कशेळी डेपो, मेट्रो मार्गिका क्रमांक (दोन ब )डी एन नगर ते डायमंड गार्डन – मंडाले, मेट्रो मार्गिका क्रमांक सहा स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी आणि छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
B. R. Gavai On Gokul President 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Embed widget