एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे विनंती केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यापूर्वी त्यांची चौकशी करावी लागते, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांना केली आहे.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं आहे. तीन विद्यार्थ्यांना पेपरचा लाभ झाल्याचं समोर आलं होतं. या तीन विद्यार्थ्यांसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.यासाठी पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात पुण्यात आंदोलन सुरु आहे. याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न पॅटर्न की वर्णनात्मक प्रश्न पॅटर्नवरुन देखील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. पुण्यात एकूण तीन ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. 

महेंद्र हरपाळकर यांची बदली

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी,क्लासचालकांची  बैठक झाली होती. त्याबैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार महेंद्र हरपाळकर यांना एमपीएससीच्या सचिव पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलं आहे. 

विवेक भीमनवार आयोगात कधी आले?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची डिसेंबर 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी कार्यभार मार्च 2026 मध्ये स्वीकारला होता. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Gunratna Sadavarte : 'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
Mohan Bhagwat On Diwali: पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget