Devendra Fadnavis on Narayan Rane, नागपूर : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, आज ( दि.28) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर निषेध नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे आमने सामने आले. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला झाला. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



महाराजांच्या पुतळ्याची जी घटना झालीये, त्यावर कोणीही राजकारण करु नये


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी घटना झालीये, त्यावर कोणीही राजकारण करु नये. निश्चितपणे ही घटना सर्वांसाठी कमीपणा आणणारी आहे. अतिशय दु:खद घटना आहे. त्याचवेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर त्याची योग्य चौकशी झाला पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तेथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. त्याबाबतची कारवाई सुरु आहे. नौदलाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे नौदल याबाबत चौकशी करुन उचित कारवाई करेन. प्रत्येक गोष्टीतून राजकारण शोधून काढायचं. प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातून पाहायचं. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण विरोधकांनी करु नये. 


राजकीय वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिले जातात


शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना हे देखील माहिती आहे की, हा पुतळा नौदलाने तयार केला होता. हा राज्य सरकारने तयार केलेला नाही. भ्रष्टाचाराला आपला विरोध असला पाहिजे. पवार साहेब अशा प्रकारे वक्यव्य करत असतील, तर मला आश्चर्य वाटतं. ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? मला वाटतं राजकीय वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिले जातात, असंही फडणवीस म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Narayan Rane: आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता: नारायण राणे