Shefali Jariwala Net Worth: शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला. शेफालीनं वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धडधाकट दिसणाऱ्या शेफालीच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेफालीचा पती पराग त्यागी तर पुरता कोसळला आहे. तर, शेफालीच्या आई-वडिलांना शेफाली आता जगात नाही, यावर विश्वास ठेवणं अशक्य झालं आहे.
शेफाली जरीवाला, तर आपल्या सर्वांच्या ओळखीचं नाव. सुपरहिट ठरलेला म्युझिक अल्बम 'काँटा लगा' 2002 मध्ये आला आणि त्यानं धुमाकूळ घातला. त्यावेळी सोशल मीडिया, इंटरनेट नसतानाही शेफालीच्या या म्युझिक अल्बमनं सर्वांना वेड लावलेलं. हा अल्बम आजही तेवढाच हिट आहे. याच अल्बममुळे शेफाली प्रसिद्धीझोतात आली आणि 'काँटा लगा गर्ल' नावानं ओळखली जाऊ लागली. रातोंरात शेफाली स्टार बनलेली.
कोट्यवधींची मालकीण आहे, शेफाली जरीवाला
शेफालीनं फिल्म्समध्ये जास्त काम केलं नाही, तरीसुद्धा तिनं आपली मोठी ब्रँड वॅल्यू सेट केलेली. मीडिया रिपोर्टनुसार, 2025 पर्यंत शेफालीची एकूण संपत्ती जवळपास 8.5 कोटी रुपये होती.
मीडिया रिपोर्टनुसार, टीव्ही शोमध्ये येण्यासाठी शेफाली 10 लाख ते 25 लाख रुपये घ्यायची. तर एखाद्या खास कार्यक्रमात गेस्ट अपिरियन्ससाठी शेफालीला लाखो रुपये दिले जायचे. कदाचितच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शेफालीला एवढी ओळख मिळवून देणाऱ्या 'काँटा लगा' गाण्यासाठी तिला फक्त 7000 रुपये मिळाले होते. पण, ज्यावेळी हे गाणं हिट झालं, त्यावेळी तिची फी लाखो रुपयांपर्यंत पोहोचली होती. शेफालीला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे आता तिच्या पश्च्यात तिचा पती पराग त्यागी किंवा तिचे आई-वडीलांकडे तिच्या संपत्तीचे सर्व हक्क जातील, असं बोलंल जात आहे.
चित्रपट आणि रिअॅलिटी शोमध्येही झळकलेली शेफाली
शेफालीनं सलमान खानच्या 'मुझसे शादी करोगी' आणि कन्नड चित्रपट 'Hudugaru' मध्येही काम केलं. याशिवाय, ती 'बिग बॉस 13' या रिअॅलिटी शोमध्येही दिसलेली, जिथे तिनं तिच्या साधेपणानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
दरम्यान, शेफाली जरीवाला अशा काही कलाकारांपैकी एक होती, ज्यांनी कोणताही गाजावाजा न करता इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं. तिनं संघर्ष केला, खरंतर प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतची वाट तिच्यासाठी फारशी सोपी नव्हीती, पण तिनं जिद्द सोडली नाही, मेहनत घेतली. असं म्हणतात की, इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर कुणीतरी गॉडफादर लागतोच. पण, शेफालीनं कोणत्याही मोठ्या गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :