Devendra Fadnavis on Maratha Reservation : ओबीसी-मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला मविआचा बहिष्कार, फडणवीसांचा शरद पवारांसह विरोधी पक्षावर हल्लाबोल

Devendra Fadnavis on Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला.

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. दरम्यान बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे फडणवीसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यावर हल्लाबोल केला. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले? 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. मात्र ऐनवेळी विरोधीपक्षाने, मविआने या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांना मराठा आरक्षणासारख्या विषयासाठी वेळ नाही. मात्र वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर राजकीय बैठक करायला वेळ आहे. यावरुन त्यांची राजकीय जात ओळखू येते. बाळासाहेब आंबेडकर यांनी एक महत्वाची भुमिका मांडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे मुद्दे लेखी मागितले पाहिजे.आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. उपस्थितांनी ज्या काही सुचना मांडल्या आहेत त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय घेतील. मला वाटले होते की शरद पवार तरी उपस्थित राहतील. मात्र महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजत राहावी अशी विरोधी पक्षाची भूमिका आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बैठकीला कोण कोण उपस्थित? 

सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण,  शंभूराज देसाई, दादाजी भुसे, अतुल सावे, धनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर,  गोपीचंद पडळकर, बच्चू कडू, भरत गोगावले, महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे : एकनाथ शिंदे 

आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष, संघटनांची भूमिका महत्वपूर्ण असून राज्यात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे अशी भुमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे मांडली. 

इतर महत्वाच्या बातम्या

पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर अॅक्शन मोडवर, थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत म्हणाले...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola