Maharashtra Assembly | विधीमंडळातल्या तीन सचिवांना अद्याप कामकाजाचं वाटप नाही
विधीमंडळातल्या तीन सचिवांना अद्याप कामकाजाचं वाटप करण्यात आलेलं नाही. शिवदर्शन साठे, मेघना तळेकर, विलास आठवले या तिन्ही सचिवांना गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पदोन्नती मिळाली होती. पदोन्नती मिळून तीन महिने उलटले तरीही त्यांना कोणतेही कामकाज देण्यात आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली आहे.