MNS - Shivsena Melava | ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा ५ जुलैला वरळी डोम मध्ये विजयी मेळावा
मस्त धोरा बाबतचा जी आर सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ५ जुलैला वरळी डोम मध्ये विजयी मेळावा काढणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार. मेळाव्याच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षांकडून नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले, "हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही. हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू." मेळाव्यासाठी झेंडे आणि बॅनरबाबत निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल.