एक्स्प्लोर

Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात श्रेयवादाची स्पर्धा असल्याची चर्चा होत आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासावर आणि पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने भाष्य केलं. महाराष्ट्र राज्य हे 2029 साली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असलेलं राज्य असेल, महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला. तसेच, पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, असेही फडणवीसांनी सांगितले.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात श्रेयवादाची स्पर्धा असल्याची चर्चा होत आहे. त्या अनुषंगाने फडणवीस यांनी कुठलीही स्पर्धा नसल्याचे स्पष्ट केले. आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली' मध्ये आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांचे श्रेय सगळ्यांचे असल्याचे सूचवले. आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत आहेत, आमच्या श्रेयवादाचे कारण नाही. कार्यकर्त्यामध्ये सीमित बुद्धी असते, आम्ही इन्फ्रा फॅमिली आहोत, त्यामुळेच आमच्यात कुठलाही श्रेयवाद नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई किंवा सिंगापूरला मागे टाकेल.

'डॉलर'वर आमचे टार्गेट मागे पुढे होते. आम्ही आमच्या टार्गेटसाठी ऑन ट्रॅक आहोत. पुढील काही वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई किंवा सिंगापूर यांना मागे टाकेल. कारण, व्हिजन इन अँक्शनमध्ये आम्ही आहोत. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही. राज्य सरकारने घेतलेल्या 100 दिवस कार्यक्रमामुळे कामाची क्षमता वाढली आहे. ज्या 20 गोष्टींसाठी जनतेला यावं लागते, त्या सेवा आम्ही AI च्या मदतीने सुलभ करू असे फडणवीसांनी सांगितले. मेट्रो 3 मुळे 35 टक्के ट्रॅफिक कमी झालं. या मेट्रोसाठी विरोध ठाकरेंनी केला, पण सुप्रीम कोर्टानेही योग्य तोडगा काढला, असे फडणवीस यांनी सांगितले. 2030 साली 52 टक्के ऊर्जा रिन्यूएबल होईल. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ज्याने एनर्जी प्लॅनिंग केलंय. आपल्या ऊर्जा खात्याला 52 अवॉर्ड मिळाले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

शरद पवारांचे सातत्या शिकण्यासारखे (Devendra Fadnavis on sharad pawar)

माझे सगळे मंत्री माझे Vision राबवत आहोत. शरद पवारांचे सातत्य हे शिकण्यासारखे आहे. शरद पवारांकडे कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं. तसेच मराठी माणूस पंतप्रधान बनेल. पण, 2029, 2034 किंवा 2039 कधी बनेल माहिती नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान

 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget