Devendra Fadnavis on Ajit Pawar, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.11) राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार तडकाफडकी निघून गेल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार (दि.10) आज या प्रकरणी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही बोलले जाते. दरम्यान, अजित पवार तडकाफडकी निघून गेल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. 




देवेंद्र फडणवीस अजितदादांबाबत काय म्हणाले?


मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार निघून गेल्याबाबत देवेंद्र फडणीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, याबाबत अजितदादाचं बोलतील. अशी मोघम प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणीस यांनी या विषयावर अधिक न बोलता मौन बाळगले असल्याचं पाहायला मिळाले आहे. 




गुन्हेगारांना शिक्षा होते का? लोकांना सेफ वाटत का? हे महत्वाचे 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नवीन तीन कायदे आणले आहेत,पोलिसांवर जास्त जबाबदारी टाकली आहे. 2014 नंतर आपण निर्णय घेतला की टेक्निकल पुरावे आपण गोळा करून गुन्हे सिद्ध करण्यास मदत होत आहे. आपण गुणात्मक परिवर्तन करत आहेत. माझ्या काळात 40 हजार पोलीस भरती केली आहे. गुन्हे घडताना दिसत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तोवर गुन्हे घडणार आहेत. त्यांना शिक्षा होते का? लोकांना सेफ वाटत का? हे महत्वाचे आहे. 


कोणी गुन्हेगारी कृत्य करणार नाही याकडे लक्ष राहू द्या


पोस्क गुन्हे,महिला अत्याचार ,ड्रग्स गुन्हे वाढत आहेत. पण महिला अत्याचार आणि ड्रग्समध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. यात कोणी आमचे अधिकारी असेल तर त्याला सेवेतून बडतर्फ करा असे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी कृत्य करणार नाही याकडे लक्ष राहू द्या. पोलिसांची पाठीशी शुभेच्छा असू द्या, असंही फडणवीस म्हणाले. 




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Shrigonda Assembly Election : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नेमकं कोणते 'पाचपुते' रिंगणात? कुटुंबात देखील इच्छुकांची गर्दी