पुणे : आज संध्याकाळी अजित पवार (Ajit Pawar) पत्रकार परिषद घेणार आहेत. काय बॉम्ब फोडणार आहेत हे माहीत नाही. नवीन एक शब्द आणला आहे राजकीय युती. भाजप (BJP) म्हणजे सगळ्यात विद्वान आहे. अजून एक गद्दारी मग महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करताना कोणी गद्दारी केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गद्दारी केली की नाही. नवीन शिवसेना, नवीन राष्ट्रवादी ही पण गद्दारीच आहे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्यातून ते बोलत होते. 


छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, शरद पवार काँग्रेसमध्ये असताना ते देशाचे नेते झाले आणि त्यानंतर त्यांना वाटलं की सोनिया गांधींना प्रमुख केलंय. त्यानंतर त्यांनी आम्ही कोणाच्या अंडर काम करणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केला.  मी कोणावर टीका करणार नाही. कारण मला पक्षाची वेगळी धोरणं समोर आणायची आहे. प्रबोधनकार ठाकरे  आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला आणि त्यांनतर काँग्रेसला विरोध केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी काय केलं हे आपल्याला माहीत आहे.  भाजपने आणि नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर टीका केली आणि घोटाळे बाहेर काढले. आता त्यांच्या सोबत सत्ता स्थापन केली. हे तुम्हाला पटतंय का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय. 


उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली


ते पुढे म्हणाले की,  प्रत्येकाने 2019 साली आपल्या भूमिका मांडल्या. सत्तेसाठी सगळे एकत्र आले. आयडियोलॉजी बदलून सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका बदलल्या.  अजित पवारांना महायुतीत घेतलं आणि म्हणायचं की ही राजकीय युती आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादी हे बाहेर पडून यांनी वेगळे गट स्थापन केले. मात्र, यापूर्वी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. हे महाराष्ट्राला चालणार नाही. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.


फसवण्याचा परफेक्ट प्रोग्राम सुरु 


मी आज कोणावरही टीका केली नाही आणि करणार नाही. शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे. मात्र, सत्तेसाठी हे कधीही सोयीनुसार एकत्र येऊ शकतात. कोणाचीही गॅरेंटी नाही. हा सगळा फसवण्याचा परफेक्ट प्रोग्राम सुरु आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी स्वराज्याची निर्मिती आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह 'निब' हे आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्यासाठी वापरायचे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकार विकत घेतले. सहकार मोडीत काढल्याचा प्रकार सुरू आहे.  मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला आहे. मात्र, मराठी शिकवणार कुठे? मराठी शाळा तरी आहेत का ? गावात प्राथमिक शाळा नाहीत. आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्यासंदर्भात आमदार, खासदार बोलत नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.  


लाडकी बहीण योजना आधी का नाही सुरु केली? 


पुण्यात ड्रंक आणि ड्राईव्हचे प्रकार आणि अत्याचाराच्या घटना वाढत आहे. लाडकी बहीण योजना आधी का नाही सुरु केली? महिलांना पैसे मिळत आहेत. मात्र, GST किती घेताय हे आपल्याला कळत नाही. विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. तुम्हाला तुच्छ लेखलं जाणार आहे. अनेक लोक आपल्यावर हसले. कोण स्वराज्य विचारतील. मात्र, मी ठरवलंय की कामातून उत्तर द्यायचे. आधी ते दुर्लक्ष करतील, हसतील त्यानंतर ते लढतील आणि त्यानंतर तुम्ही जिंकता, असा महात्मा गांधींच्या वाक्याचा पुनरुच्चार संभाजीराजे यांनी केला. 


नवीन शिवसेना, नवीन राष्ट्रवादी ही पण गद्दारीच 


आमची काय टिंगल करायची आहे ते करा. आम्ही प्रत्येकाला कामातून उत्तर देणार आहोत. राजकारण माझं पिंड नाही पण मी आता राजकारण शिकलोय. स्वराज्य पक्षाच्या लोकांनी दचकायचं नाही, मी तुमच्यासोबत आहे. संभाजीराजे सामान्य नाही. हा कणखर आहे. घोड्यावर स्वार झालंय आता उतरायचं नाही. चुकीचे स्वप्न बघायचे नाही साकार होणारे स्वप्न बघायचे. सोयीसाठी सगळे इकडून तिकडे गेले.  राष्ट्रवादी महायुतीसोबत गेली की नाही. आज संध्याकाळी अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. काय बॉम्ब फोडणार आहेत हे माहीत नाही. नवीन एक शब्द आणला आहे राजकीय युती भाजप म्हणजे सगळ्यात विद्वान आहे.  अजून एक गद्दारी मग महाविकास आघाडी करताना कोणी गद्दारी केली होती. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली की नाही. नवीन शिवसेना, नवीन राष्ट्रवादी ही पण गद्दारीच आहे, असे म्हणत संभाजीराजे यांनी सर्व पक्षांवर टीका केली आहे. 


आणखी वाचा 


Satej Patil : संभाजीराजेंनी भूमिका घेताना जरा विचार करायला हवा होता; विशाळगड घटनेवर सतेज पाटील पहिल्यांदाच बोलले