एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार; नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा अनावरण सोहळ्याला या दोन्ही नेत्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही अवताडे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्व

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एका स्टेजवर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व प्रचंड वाढले आहे. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जरांगे दादांनीही या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे,” असे त्यांनी म्हटले. 

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil: राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये म्हणून सरकारने त्या वेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने या अनावरण सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते आणि समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर दिसणार का? हे 26 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

Satara Crime: सीएम देवेंद्र फडणवीसांची थेट सातारा एसपींना फोनाफोनी, बलात्कारी PSI गोपाल बदने तत्काळ निलंबित; SP तुषार दोशी काय काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget