एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'

Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार, फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'

Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election 2026: आगामी विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीला मोठा फायदा झाला होता. यावरुन शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर निवडणुकीतील (Vidhan Parishad Election 2026) हा घोडेबाजार रोखण्यासाठी आपण लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती.  या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, असे फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

यापुढे पैशांच्या जीवावर कोणी निवडून येऊ नये, म्हणून मी लोकसभेत बिल मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी एवढंच म्हणेन की, माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे तुम्हाला समजलं तर असं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे, यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर माझी हरकत नाही. माझंही मत आहे की, निवडणूक प्रक्रियेत परिवतर्न झालं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्याही माघारीबाबत भाष्य केले. बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. मुख्यमंत्री निर्णय करत नाहीत, प्रदेशाध्यक्ष करतात तो निर्णय मला मान्य असेल. बाळ माने हे आमचेच होते. रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Supriya Sule:  भाजपने मला तोंड उघडायला लावू नये: सुप्रिया सुळे

अलीकडच्या सगळ्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार होतो, तो बंद झाला पाहिजे. तसेच अन्य पक्षाच्या उमेदवारांना तपास यंत्रणांची भीती दाखवू नये. महाविकास आघाडीला भाजपचे नेते माघार आघाडी म्हणून हिणवत आहेत. त्यांना मी एवढेच सांगेन की, भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृत आहे, त्यामुळे काही बोलत नाही. तो माझा स्वभाव नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही ताकदीने लढू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget