एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

Devendra Fadnavis: राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामात होणारी दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. भगवान भरोसे काम चालवू नका, ऐसे कैसे काम चलेगा? अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शासकीय यंत्रणांना आणि कंत्राटदारांना फटकारले आहे. इतकेच नाही तर, प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा, पुढच्या मीटिंगला एकही प्रलंबित मुद्दा शिल्लक राहू नये, असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व मोठे आणि महत्त्वाचे प्रकल्प येत्या साडेतीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित पायाभूत सुविधा वॉर रूमच्या अत्यंत महत्त्वाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रकल्प लांबल्यामुळे राज्य आणि देशाचे मोठे आर्थिक नुकसान होते, याकडे लक्ष वेधत त्यांनी प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis: कंत्राटदारांचा 'पास्ट रेकॉर्ड' तपासा, मगच काम द्या

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांच्या प्रमुखांना कडक सूचना दिल्या की, यापुढे निविदेच्या (Tender) अटींमध्ये कंत्राटदारांचा पूर्वीचा रेकॉर्ड अनिवार्यपणे तपासला जावा. आधीच्या प्रकल्पांना विनाकारण विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना नवीन पायाभूत सुविधांचे प्रकल्प देऊ नयेत. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांच्या मार्गातील सर्व अडथळे तातडीने दूर करून ते वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

Devendra Fadnavis: धारावी आणि बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती देण्याचे आदेश

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (Dharavi Redevelopment Project) सविस्तर आढावा घेतला. धारावीतील स्थानिक उद्योजकांना बळ देण्यासाठी आणि तेथील अनौपचारिक अर्थव्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य वस्तू आणि सेवा कर सवलत देण्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न विविध विभागांच्या समन्वयाने सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र रहिवाशांना भाडे दिल्यानंतर, सध्याच्या घरांचा ताबा विनाविलंब घेऊन प्रत्यक्ष कामाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Devendra Fadnavis: मुंबई-ठाण्यातील बोगदे आणि सी-लिंकसाठी डेडलाईन

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प जानेवारी 2029 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वांद्रे ते वर्सोवा सी लिंक या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासोबतच, या सर्व प्रकल्पांसाठी लागणाऱ्या इंधनाचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: विरार-अलिबाग मल्टि-मोड कॉरिडॉरसाठी विशेष नियोजन

विरार ते अलिबाग मल्टि-मोड कॉरिडॉरसाठी (Virar to Alibaug Multi-Modal Corridor) जमीन संपादन प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीच्या वाढणाऱ्या मूल्यांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी योग्य नियोजन यंत्रणा तयार करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच या कॉरिडॉरच्या बाजूला गुंतवणूकदारांच्या सहभागातून औद्योगिक विकासासाठी विशेष क्षेत्रे निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

Devendra Fadnavis: या महत्त्वाच्या प्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा 

  • मेट्रो लाईन 2 ब (डी एन नगर ते मंडाले),
  • मेट्रो लाईन 2 (कासारवडवली ते वडाळा),
  • मेट्रो लाईन 5 (ठाणे – भिवंडी- कल्याण),
  • मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी),
  • मेट्रो लाईन 7 अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ),
  • मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर),
  • शिवडी ते वरळी उन्नत मार्ग,
  • पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी टप्पा 1 मेट्रो लाईन ,
  • छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना,
  • पुणे शहरातील मान – हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो लाईन 3,
  • मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प,
  • पुणे वर्तुळाकार मार्ग,
  • विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर,
  • वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू मार्ग,
  • गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्प,
  • ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प,
  • ना.म जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प,
  • धारावी पुनर्विकास प्रकल्प.

आणखी वाचा 

'कॉकरोच जनता पार्टी'चं वादळ भारतात दाखल, अभिजीत दीपके बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन पहिल्यांदाच समोर, दिल्ली एअरपोर्टवर स्वागताला प्रचंड गर्दी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget